ejuri news साकुर्डेत भैरवनाथ जनसेवा पॅनलची एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:26+5:302021-01-19T04:12:26+5:30

निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश सस्ते, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, खरेदी-विक्री संघाचे ...

ejuri news One-sided power of Bhairavnath Janseva Panel in Sakurd | ejuri news साकुर्डेत भैरवनाथ जनसेवा पॅनलची एकहाती सत्ता

ejuri news साकुर्डेत भैरवनाथ जनसेवा पॅनलची एकहाती सत्ता

Next

निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश सस्ते, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते आणि सेनेचे वामन सस्ते यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय भैरवनाथ जनसेवा पॅनल आणि काँग्रेसचे माजी सरपंच मारुती सस्ते आणि राजेंद्र सस्ते यांच्या भैरवनाथ ग्राम विकास पॅनलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांकडून झाला होता. मात्र, काँग्रेसच्या गाव पातळीवरील पुढाऱ्यांनी हाणून पाडला होता. निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारले आहे. ग्रामपंचायतीच्या इतिहासात अशा प्रकारची एकहाती निवडणूक प्रथमच पाहावयास मिळाली.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

प्रभाग १

सर्वसाधारण जागा - अजित संपत जाधव ३५१ मते, राजेंद्र शरद जाधव ३१० मते

सर्वसाधारण महिला - लिलाबाई मच्छिंद्र गायकवाड ३१४ मते प्रभाग २

इतर मागासवर्गीय महिला - तृप्ती नीलेश जगताप ३३१ मते

सर्वसाधारण जागा - रमेश सदाशिव जाधव ३२१ मते

सर्वसाधारण महिला प्रमिला संतोष जगताप ३०८ मते प्रभाग ३

इतर मागासवर्गीय - सचिन अरुण थोपटे ४४१ मते

सर्वसाधारण महिला नीलम श्रीकांत सस्ते ३९८ मते

स्वाती विजय पवार - ४३५ मते

Web Title: ejuri news One-sided power of Bhairavnath Janseva Panel in Sakurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.