एकांकिका ही प्रयोगशाळा- गजेंद्र अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:20 AM2019-01-30T03:20:29+5:302019-01-30T03:20:48+5:30

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा

Ek Dinika Laboratory - Gajendra Ahire | एकांकिका ही प्रयोगशाळा- गजेंद्र अहिरे

एकांकिका ही प्रयोगशाळा- गजेंद्र अहिरे

googlenewsNext

पुणे : एकांकिका ही स्पर्धा नसून प्रयोगशाळा आहे, ज्यात असे अभिनय रसायन तयार होते जे पुढची पिढी घडवते आणि त्यातूनच नव्या विषयांवरील चित्रपट व नाटकांची निर्मिती ही पिढी करते. तरुणाईला आपली कला सादर करण्याच्या बरोबरीने आपले विचार मांडण्याचे हे प्रभावी माध्यम असून, या स्पर्धेद्वारे ते आपल्या कलागुणांचा विकास करू शकतात. म्हणूनच नवी पिढी घडविण्यासाठी एकांकिका हे महत्त्वाचे माध्यम आहे, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केली.

मनविसे कोथरूड विभागाच्या वतीने ‘राज सन्मान करंडक २०१९’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी गजेंद्र अहिरे बोलत होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व अभिनेते रमेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

मनसेचे ज्येष्ठ नेते अनिल शिदोरे, शहराध्यक्ष अजय शिंदे, स्पर्धेचे निमंत्रक किशोर शिंदे, रणजित शिरोळे, गणेश सातपुते, माजी नगरसेविका पुष्पा कनौजिया, नगरसेविका रुपाली पाटील, विक्रांत अमराळे, कल्पेश यादव, योगेश बनकर, प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण, स्पर्धेचे आयोजक आणि मनविसे कोथरूड विभागाचे अध्यक्ष शशांक अमराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अजित वारणशिवार यांनी सूत्रसंचालन केले. शशांक अमराळे यांनी आभार मानले.

‘भिंत’ला पहिले पारितोषिक
स्पर्धेचे विजेतेपद भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘भिंत’ या एकांकिकेने पटकावले. दुसरे पारितोषिक कावेरी कॉलेज आॅफ आटर््स, कॉमर्स अँड सायन्सच्या ‘रोग’ या एकांकिकेला, तर तिसरे पारितोषिक आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ‘अंधार’ या एकांकिकेला मिळाले.
सर्वोत्तम दिग्दर्शनसाठी चिन्मय कुलकर्णी व उत्कर्ष खोंदले (भिंत, भिवराबाई सावंत अभियांत्रिकी), लेखनासाठी रोहित कुलकर्णी (रोग, कावेरी कॉलेज आॅफ आटर््स, कॉमर्स अँड सायन्स) यांना पारितोषिक देण्यात आले. सर्वोत्तम स्त्री अभिनयासाठी चैत्राली क्षीरसागर (रोग, कावेरी कॉलेज आॅफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स) तर सर्वोत्तम पुरुष अभिनयासाठी उत्कर्ष खोंदले (भिंत, भिवराबाई सावंत अभियांत्रिकी) यांना गौरविण्यात आले. शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक डोंबिवली येथील मॉडर्न महाविद्यालयाला देण्यात आले.

एकांकिका स्पर्धा ही तरुणांसाठी आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ आहे. पण एकांकिका करताना तरुणाई शिस्त व नियमांचे उल्लंघन करतात. एकांकिका किंवा नाटकामध्ये शिस्त असणे आवश्यक आहे, तरच एकांकिका रंगू शकेल. स्पर्धेत १७ संघ सहभागी झाले होते, त्यापैकी आठ संघांनी अंतिम फेरीत एकांकिका सादर केल्या. स्पर्धेचे परीक्षण प्रकाश पारखी, विनीता पिंपळखरे, अरुण पटवर्धन व दीपाली निरगुडकर यांनी केले.
- निपुण धर्माधिकारी

Web Title: Ek Dinika Laboratory - Gajendra Ahire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.