Eknath Shinde: पुण्यात रिक्षावाल्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत, युनिफॉर्म अन् रिक्षाची प्रतिकृतीही भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 08:11 PM2022-07-09T20:11:33+5:302022-07-09T20:14:22+5:30

हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचा विजय आहे, असे या रिक्षावाल्यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde: Welcome to the Chief Minister Eknath Shinde from rickshaw pullers in Pune, also a replica of the uniform and rickshaw | Eknath Shinde: पुण्यात रिक्षावाल्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत, युनिफॉर्म अन् रिक्षाची प्रतिकृतीही भेट

Eknath Shinde: पुण्यात रिक्षावाल्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत, युनिफॉर्म अन् रिक्षाची प्रतिकृतीही भेट

Next

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीतील पंतप्रधानांच्या भेटीनंतर थेट पुण्याला येत आहेत. पुणे येथून ते पंढरपूरकडे आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी रवाना होत आहेत. तत्पूर्वी, पुण्यातील बघतोय रिक्षावाला या ग्रुपकडून रिक्षाचालकांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक असणारे, सामान्य कुटुंबातुन येणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभले आहेत ही एक ऐतिहासिक घटना आहे. सामान्य कष्टकरी पार्श्वभूमी असणारे सुद्धा या देशात मुख्यमंत्री पदासारखी मोठी जवाबदारी घेण्यास पात्र आहेत, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचा विजय आहे, असे या रिक्षावाल्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्यातील समस्त 12 लाख रिक्षाचालकांना व रिक्षा व्यवसायावर प्रत्यक्षपणे अवलंबून असणाऱ्या 60-70 लाख नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबातील सदस्य वाटत असून त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. काही धनदांडग्या प्रवृत्ती मुख्यमंत्री महोदयांना रिक्षाचालक म्हणून हिनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून, अशा लोकांना कष्टकरी वर्गातील कर्तृत्ववान व्यक्तींबाबत आकस असल्याचे निदर्शनास येत आहे. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांना पाठिंबा म्हणून टीम 'बघतोय रिक्षावाला' तर्फे मुख्यमंत्री यांना रिक्षाची प्रतिकृती व त्यांचे नाव असणारा रिक्षाचा युनिफॉर्म रिक्षाचालक कुटुंबीयांतर्फे भेट देण्यात येणार आहे. तसेच रिक्षाचालकांच्या मागण्यांचे निवेदन सुद्धा मुख्यमंत्र्यांना संघटनेमार्फत आज नगरसेवक नाना भानगिरे यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात देण्यात येईल. स्वागतासाठी हजारोंच्या संख्येमध्ये रिक्षाचालक उपस्थित राहणार आहेत.
 

Web Title: Eknath Shinde: Welcome to the Chief Minister Eknath Shinde from rickshaw pullers in Pune, also a replica of the uniform and rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.