कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:00 PM2018-10-10T21:00:09+5:302018-10-10T21:08:35+5:30

महाराष्ट्रातील तमाम कोळी, आग्री, सिकेपी अशा विविध समाजाची कार्ला गडावरील एकविरा देवी ही कुलस्वामिनी आहे.

ekvira devi ghtasthapana on Carla fort | कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना 

कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना 

googlenewsNext
ठळक मुद्देप्रथमच शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची पुजा व घटस्थापना प्रशासकीय समितीच्या देखरेखेखाली यावर्षी प्रथमच नवरात्रौ उत्सव

लोणावळा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात सकाळी सात वाजता मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक पुजा करत घटस्थापना करण्यात आली. यावेळी प्रथमच शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची पुजा व घटस्थापना करण्यात आली.
    देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील तमाम कोळी, आग्री, सिकेपी अशा विविध समाजाची कार्ला गडावरील एकविरा देवी ही कुलस्वामिनी आहे. कार्ला गडावर पहाटे सहा वाजता देवीचा विधिवत अभिषेक करत तहसिलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना करत देवीची पहाट आरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, वेहेरगावचे सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी सरपंच गणपत पडवळ, मंडल अधिकारी माणिक साबळे हे उपस्थित होते. 
    श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये दोन गट पडून त्यांच्यात वाद सुरु असल्याच्या पार्श्वभुमीवर याठिकाणी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वे त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रशासकीय समितीच्या देखरेखेखाली यावर्षी प्रथमच नवरात्रौ उत्सव पार पडत असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

Web Title: ekvira devi ghtasthapana on Carla fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.