Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकविरा देवीची यात्रा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 09:20 AM2020-03-14T09:20:21+5:302020-03-14T09:25:20+5:30

सर्व धार्मिक विधी व पूजापाठ परंपरेनुसार होणार

Ekvira Devis yatra cancelled due to coronavirus kkg | Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकविरा देवीची यात्रा रद्द

Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकविरा देवीची यात्रा रद्द

googlenewsNext

लोणावळा: कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. चैत्री यात्राकाळातील देवीचे सर्व धार्मिक विधी व पूजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून जाहीर यात्रा न भरवण्याचा निर्णय श्री एकविरा देवस्थान कार्ला येथील प्रशासकीय समितीने घेतला आहे.

वडगाव मावळ येथे प्रशासकिय समितीचे अध्यक्ष व वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश, सचिव व मावळचे तहसीलदार व सदस्य सह धर्मदाय आयुक्त यांनी भाविक व वेहेरगाव ग्रामस्त यांच्याशी बैठक घेत हा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी वेहेरगाव ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा न भरवण्याचा ठराव मंजूर केला होता.

देशासह महाराष्ट्रात सर्वत्र कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत सर्व सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तसे आदेश दिले आहेत. 

एकविरा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील वेहेरगाव गावात असून येथे चैत्री यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे होणाऱ्या गर्दीतून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने भाविकांनी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यात्रा काळात तसेच दैनंदिन काळात देवीचे सर्व धार्मिक विधी, पूजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याने प्रशासकीय समितीने स्पष्ट केले.
 

Web Title: Ekvira Devis yatra cancelled due to coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.