वढू बुद्रुक येथे वीज पडून वृद्ध दाम्पत्य जखमी; सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 12:35 IST2023-06-08T12:33:37+5:302023-06-08T12:35:02+5:30
आजी आजोबा व नातू रानातून घरी येत असताना वर तारांवर वीज पडली...

वढू बुद्रुक येथे वीज पडून वृद्ध दाम्पत्य जखमी; सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला
कोरेगाव भीमा (पुणे) : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील जोरदार सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट सुरू होता. वढू बुद्रुक येथील अनाजीचा मळा येथील शेतकरी आजी आजोबा व नातू रानातून घरी येत असताना वर तारांवर वीज पडली.
अपघातात लक्ष्मीबाई उत्तम भंडारे या जखमी झाल्या त्यांना अचानक पडलेल्या विजेमुळे वृद्ध दाम्पत्य घाबरले तसेच ते जागीच बेशुद्ध पडले. नातेवाइकांनी लक्ष्मीबाई भंडारे यांना वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात लक्ष्मीबाई यांना जास्त भाजले असून उत्तम भंडारे हे किरकोळ जखमी झाले आहेत तर दैव बलवत्तर म्हणून १४ वर्षीय नातू ओम याला पुढे पळत आल्याने तो सुखरूप आहे.