पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून, देहूरोड सेंट्रल चौकातील घटना, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 03:25 AM2017-09-13T03:25:13+5:302017-09-13T03:25:13+5:30

मारहाण केल्याच्या कारणावरून सतरा वर्षीय युवकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड पोलीस ठाण्यापासून नजीक असलेल्या सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी सात -आठ जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

 Elderly murder, Dehuroad Central Chowk incident, eight people booked for defamation | पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून, देहूरोड सेंट्रल चौकातील घटना, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून, देहूरोड सेंट्रल चौकातील घटना, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

googlenewsNext

देहूरोड : मारहाण केल्याच्या कारणावरून सतरा वर्षीय युवकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड पोलीस ठाण्यापासून नजीक असलेल्या सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी सात -आठ जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
सुभान ऊर्फ शाबीर अमीन सोलंकी (वय १७, रा. गांधीनगर, देहूरोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र चेतन ऊर्फ सोन्या बाळू पांडे (वय २०, रा. देहूगाव) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश बिडलान व त्याच्याबरोबर असलेले सात-आठ अनोळखी साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री अंकुश बिडलान यास मारहाण केल्याच्या कारणावरून बिडलान व त्याचे अनोळखी सात ते आठ साथीदारांनी चेतन पांडे याचा मित्र सुभान ऊर्फ शाबीर यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड मारून ठार मारले. फिर्यादी चेतन पांडे यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे अधिक तपास करीत आहेत. सुभानवर देहूरोड व तळेगाव पोलीस ठाण्यात विविध प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. 

Web Title:  Elderly murder, Dehuroad Central Chowk incident, eight people booked for defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.