गॅसचा भडका होऊन ज्येष्ठ दाम्पत्य भाजले; कसबा पेठेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:43 PM2020-10-21T12:43:21+5:302020-10-21T12:44:02+5:30
सकाळी हे दाम्पत्य झोपेतून उठले़. त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस सुरु करतानाच अचानक भडका झाला.
पुणे : सकाळी उठल्यावर पाणी तापविण्यासाठी गॅस सुरु करताच घरात साठून राहिलेल्या गॅसचा भडका उडून त्यात ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य भाजले. ही घटना कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीजवळील जोशी निवास येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
ठाकरसी त्रिभुवन सोळंकी (वय ९०) आणि वसंतबाई ठाकरसी सोळंकी अशी भाजलेल्यांची नावे आहेत.
अग्निशमन दलाचे अधिकारी सुनिल नाईक ननवरे यांनी सांगितले की, जोशी निवास येथे पार्किगमध्ये छोट्या खोलीमध्ये हे दाम्पत्य राहतात. सिलिंडरच्या व्हॉलमधून गॅस गळती होऊन तो रात्रभर घरात पसरला होता. सकाळी हे दाम्पत्य उठले़ त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस सुरु करतानाच अचानक भडका झाला. त्यात दोघेही खूप भाजले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल केली. जवानांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.