पोटनिवडणुकीत ४६.०९ टक्के मतदान
By Admin | Published: January 11, 2016 01:32 AM2016-01-11T01:32:59+5:302016-01-11T01:32:59+5:30
काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी दिवसभरात ४६.०९ टक्के मतदान झाले.
पिंपरी : काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी दिवसभरात ४६.०९ टक्के
मतदान झाले. सोमवारी सकाळी निकाल असून, एका तासात चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिकेची प्रभाग क्रमांक २६ ‘अ’ (काळभोरनगर) ही जागा रिक्त झाल्याने रविवारी या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसह, भाजपा, शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान झाले. या प्रभागात एकूण १८ हजार ३२६ मतदार असून, यापैकी ८ हजार ४४६ जणांनी रविवारी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये ४ हजार ७०७ पुरुषांचा, तर ३ हजार ७३९ महिलांचा समावेश आहे. अशाप्रकारे दिवसभरात एकूण ४६.९ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत २ हजार ८६१ जणांनी मतदान केले. अकरानंतर मतदानासाठी मतदार घराबाहेर पडू लागले. साडेअकरा ते दीड या वेळी २ हजार १११
जणांनी मतदान केले. दीडनंतर मतदानाचे प्रमाण काहीसे कमी झाले. दीड ते साडेतीन या वेळेत १ हजार ७६८, तर साडेतीन ते साडेपाच या वेळेत १ हजार ७०६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला.
एकूण २० केंद्रांवर ही मतदानप्रक्रिया पार पडली. या केंद्रावर ८० अधिकारी, २० पोलीस आणि २० कर्मचारी कार्यरत होते. निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात
आले. प्रत्येक केंद्रावर कडेकोट
पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. (प्रतिनिधी)