जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी २४ जानेवारीला निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 08:31 PM2020-01-14T20:31:38+5:302020-01-14T20:35:29+5:30
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची संधी हुकलेल्या अनेक इच्छुकांनी आता सभापती पदांसाठी मोर्चेबांधणी केली सुरु..
पुणे : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीच्या ४ जागांसाठी येत्या ४ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी पुढील दोन वर्षांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. आता विषय समित्यांच्या सभापती पदाच्या ४ जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. यामध्ये बांधकाम सभापीत, महिला व बालकल्याण सभापती, समाज कल्याण सभापती आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती अशा चार विषय समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे पीठासीन अधिकारी सचिन बारवकर यांनी मंगळवार (दि.१४) रोजी निवडणुकीसाठी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पत्र जारी केले. जिल्हा परिषदेच्या ५ व्या मजल्यावरील सभागृहामध्ये ही निवडणूक होणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी हुकलेल्या अनेक इच्छुकांनी आता सभापती पदांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, सर्व सभापतीपदी पक्षाचे सदस्य निवडणूक येऊ शकतात.
--
राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळणार
राज्यात नव्यान स्थापन झालेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही सहकार्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करुन घेण्याचा विचार राष्ट्रवादी काँगे्रसचे वरिष्ठ नेते करत आहेत. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी याबाबत संकेत दिले होते. त्यानुसार ४ पैकी २ सभापती पद मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांमध्ये सुरु आहे. याबाबत पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात काँग्रेसला पुरंदर तालुक्यातील एका सदस्याला आणि शिवसेनेच्या एका सदस्याला ही संधी मिळू शकते.
लॉटरीच्या नावाखाली शहरात मटका