राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणूकीस पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:20+5:302021-01-17T04:11:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यातील ६५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांना राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता नव्या निर्णयानुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यातील ६५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांना राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता नव्या निर्णयानुसार या निवडणूकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती मिळाली आहे. निवडणूक स्थगित करण्याला मार्च २०२१ मध्ये बरोबर वर्ष पुर्ण होत आहे.
यापुर्वीची ३१ डिसेंबरची स्थगितीची मुदत संपल्यानंतर १२ जानेवारीला राज्य सरकारने या निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला. वर्षभर सातत्याने स्थगिती देत असल्याने या संस्थांच्या संख्येत आता भर पडत चालली आहे. आजमितीस राज्यात तब्बल ६५ हजार सहकारी संस्था आधीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे निवडणूकीस पात्र झाल्या आहेत.
सरकारच्या १२ जानेवारीलाच्या आदेशानुसार राज्य सहकार सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी निवडणूकांची पुर्वतयारी सुरू केली होती. मात्र आता सरकारच्या निर्णयामुळे ही तयारी थांबवावी लागणार आहे.