ऐन निवडणुकीत अवैध बांधकामांचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:26 AM2019-04-05T00:26:17+5:302019-04-05T00:26:48+5:30
अधिकारी निवडणूक कामात व्यस्त : नागरिकांचा वाढीव बांधकामांवर जोर
थेरगाव : लोकसभा निवडणुकीच्या कामात प्रशासनातील अधिकारी गुंतल्याचा लाभ उठवत थेरगाव मधील अनके भागात नागरिकांनी अनधिकृत बांधकामे उभारणीचे कामे सुसाट सुरु केली आहेत. त्यामुळे निवडणूक काळात फोफावणारी अनधिकृत बांधकामे कोण रोखणार, असा सवाल उपस्थित होत आहे. निवडणुकांमध्ये अनधिकृत मुद्याचे भांडवल होत असल्याने राजकीय मंडळींकडून अनधिकृत बांधकामे नियमित केली जातील, अशी आश्वासने नागरिकांना दिली जात असल्याने बांधकामांना चांगलेच पेव सुटले आहेत.
अनधिकृत बांधकामाची समस्या जुनीच असून, गेल्या काही वर्षात शहराला बेकायदा बांधकामांचा जणू विळखाच पडला आहे. लोकसभा निवडणुकींच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आचार संहिता सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात कारवाया होत नाहीत, या समजाने अनधिकृत बांधकामधारकांनी आचार संहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु केली आहेत. याकडे महापालिका कर्मचा?्यांचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे. मागील पाच वर्षात शहरात मोठ?ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढली असून महापालिकेतील ७५ टक्के अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी गुंतल्याने अनधिकृत बांधकामे उभारणा-यांना मोकळे रानच मिळाले आहे.
अनधिकृत बांधकामांकडे पाहण्यास कुणालाही वेळ नसल्याने अनधिकृत बांधकाम करणारेही निर्धास्त असल्याचे चित्र आहे. दुरुस्तीच्या नावाखाली दुकानांचे आणि घराचे मजले वाढवण्याचे , तर काही ठिकाणी नव्याने बांधकाम करत असल्याचे प्रताप सुरू असून त्याकडे पाहण्यासाठीही पालिका अधिका-यांचा फुरसत नसल्याचा चित्र दिसत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या
जातात. कारवाईसुद्धा केली जाते परंतु कारवाई करताना राजकीय नेत्यांच्या सल्ल्याने ती केली जाते.
राजकीय पाठबळ नसलेल्या व्यक्तीवरच कारवाई होते.
आयटीनगरी परिसरात अवैध बांधकामे
४हिंजवडी : पिंपरी चिंचवड शहराला अगदी लागुनच असलेल्या आयटीनगरी परिसरात सुद्धा अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. प्रामुख्याने माण, हिंजवडी, मारूंजी, जांबे, नेरे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत शेकडो विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. हा परिसर पीएमआरडीए विभागाच्या अखत्यारीत आहे. बांधकाम करण्यास परवानगी देणे तसेच अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी या विभागाची आहे मात्र परिसरात शेकडो अनाधिकृत बांधकामे सुरु असताना देखील पीएमआरडीए ला थांगपत्ता लागत नाही हे विशेष.
४स्थानिक ग्रामपंचायत सुद्धा अशा बांधकामाकडे कानाडोळा करत असल्याचे वास्तव आहे. वाढते औद्योगिकीकरण व आयटीपार्क मुळे ग्रामीण परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. लाखो नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त याच परिसरात वास्तव्य करत आहे, भाडेतत्त्वावर वास्तव्य करणार?्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खोल्या भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्नाचा नवा स्त्रोत स्थानिक ग्रामस्थांसाठी तयार झाला आहे, यातुनच अनाधिकृत बांधकामांना चालना मिळत असल्याचे काही सुज्ञ ग्रामस्थांचे मत आहे