राजरोसपणे भाजपचा प्रचार करणा-या निवडणूक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 06:31 PM2019-04-23T18:31:38+5:302019-04-23T18:33:44+5:30

मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्याबाबत हा सर्व प्रकार घडला...

The election officer caught the enthusiasm of spreading the BJP politically | राजरोसपणे भाजपचा प्रचार करणा-या निवडणूक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

राजरोसपणे भाजपचा प्रचार करणा-या निवडणूक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

Next
ठळक मुद्देसंबंधित केंद्रावरील निर्वाचन अधिकारी यांच्याकडे आणि खडक पोलिस ठाण्यात तक्रार

पुणे : कसबा मतदार संघातील एका मतदान केंद्रावर भाजपचा राजरोसपणे प्रचार करणा-या निवडणूक अधिका-याला काँग्रेसच्याच पदाधिका-यांनी रंगेहाथ पकडले. प्रभाग क्रमांक 188 मधील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे तिथे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले . हा प्रकार कळताच महापौर मुक्ता टिळक यांच्यासह उमेदवार मोहन जोशी यांनी केंद्राकडे धाव घेतली. त्या निवडणूक अधिका-याविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्याबाबत हा  सर्व प्रकार घडला. ते म्हणाले मतदान केंद्रात निवडणूक अधिकारी राजेश भोसले हे मतदारांना  ‘भाजपला मतदान करा’ असे सांगत होते. शासकीय अधिका-याने असे सांगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हा अधिकारी सकाळपासूनच हे मतदारांना सांगत होता. ही बाब निर्वाचन अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर उमेदवार मोहन जोशी इथे आले आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितले. हे प्रकार होत असतील ही लोकशाहीची विटंबना आहे. अशाप्रकारे भाजपला निवडणूका जिंकायच्या असतील तर त्या निवडणूकीला काही अर्थ नाही.याप्रकरणी संबंधित केंद्रावरील निर्वाचन अधिकारी यांच्याकडे आणि खडक पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेतले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 भारतीय जनता पक्षाने कुठल्याही शासकीय अधिका-याला कुणाला मत द्या हे सांगण्यास सांगितले नाही. देशासाठी मतदान करा असे कोणतीही व्यक्ती कुणालाही सांगू शकते-महापौर मुक्ता टिळक 
-------------------------------------------------------------------------------
गिरीश बापट शासकीय अधिका-यांमार्फत काँग्रेसला मत देण्यास अटकाव करतील हे आम्ही आधीच लक्षात आणून दिले होते. शासकीय अधिका-यांमार्फत भाजपचा प्रचार करणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सकाळपासूनच हे शहरातील अनेक मतदार केंद्रावर सुरू आहे. यात सर्व अधिकारी सहभागी आहेत- मोहन जोशी, कॉंग्रेस

Web Title: The election officer caught the enthusiasm of spreading the BJP politically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.