विकासकामे करणाऱ्याला निवडणुकीत संधी : दिलीप मोहिते पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:55+5:302021-03-16T04:10:55+5:30

चाकण नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक दोनमधील स्वीकृत नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी स्वखर्चाने दीड लाख रुपयांचे चाकण आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळा ते ...

Election Opportunity for Development Workers: Dilip Mohite Patil | विकासकामे करणाऱ्याला निवडणुकीत संधी : दिलीप मोहिते पाटील

विकासकामे करणाऱ्याला निवडणुकीत संधी : दिलीप मोहिते पाटील

Next

चाकण नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक दोनमधील स्वीकृत नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी स्वखर्चाने दीड लाख रुपयांचे चाकण आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळा ते केएसएच कंपनीच्या दरम्यान गतिरोधक बसवण्यात आले आहे. तसेच माऊलीनगर येथे दोन लाख रुपयांची स्ट्रीट लाईट व अडीच लाख रुपये खर्च करून श्रीनगर कॉलनीमधील पाण्याची पाइपलाइनचे काम केली आहेत. तसेच गणेशनगर येथील आमदार फंडातून मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता आदी कामांचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, स्वीकृत नगरसेवक विशाल नायकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे, विरोधी पक्षनेते जीवन सोनावणे, संगीता नाईकरे,योगेश देशमुख,किरण कौटकर,बाळासाहेब गायकवाड,उद्योजक रणजित जरे,वेंकटेश सोरटे, राहुल नाईकवाडी तसेच गणेशनगर,आदर्श नगर,श्रीनगर व माऊलीनगर नागरिक उपस्थित होते.नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात दिल्यास चाकण शहरात स्वच्छ पाणीपुरवठा, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त गटार लाइन तसेच सांडपाणी व कचरा प्रक्रिया प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने काम केले जातील. सूत्रसंचालन वेंकटेश सोरटे यांनी केले, तर आभार राहुल नायकवाडी यांनी मानले.

चाकण येथील झित्राईमळा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना.

Web Title: Election Opportunity for Development Workers: Dilip Mohite Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.