पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ व १० फेब्रुवारीला: डाॅ.राजेश देशमुख यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 07:33 PM2021-02-01T19:33:49+5:302021-02-01T19:35:35+5:30

कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या.

Election for Sarpanch post of 748 Gram Panchayats in Pune district on 9th and 10th February: Order of Dr. Rajesh Deshmukh | पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ व १० फेब्रुवारीला: डाॅ.राजेश देशमुख यांचे आदेश

पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ व १० फेब्रुवारीला: डाॅ.राजेश देशमुख यांचे आदेश

Next

पुणे : जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत येत्या 9 व 10 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात सर्व तहसिलदारांना आदेश देऊन सरपंच / उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून अव्वल कारकून, मंडल अधिकान्याची अथवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सांगितले आहे. 

कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यात जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडत देखील करण्यात आले होते, परंतु शासनाने नंतर राज्यातील जाहिर झालेली सरपंच आरक्षण रद्द करून निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यास सांगितले.जिल्ह्यात नुकतेच नव्याने सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली असून, येत्या 9 व 10 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत. 

दरम्यान,पुरंदर तालुक्यातील पिंगोरी, हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी, औताडे-हांडेवाडी व बारामती तालुक्यातील माळेगांव या चार ग्रामपंचायतीमध्ये एक द्वितीयांशा इतकी सदस्य पदे निवडून आलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक नेमणेबाबत संबंधीत गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Election for Sarpanch post of 748 Gram Panchayats in Pune district on 9th and 10th February: Order of Dr. Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.