जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:04+5:302020-12-22T04:12:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेवारी अर्ज दाखल करण्यास ...

Election sword hanging over five gram panchayats in the district | जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीची टांगती तलवार

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीची टांगती तलवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून (दि २३) सुरुवात होत आहे. परंतु हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हांडेवाडी आणि वडाची वाडी या तीन ग्रामपंचायतीचा पुणे महापालिकेत समाविष्ट होण्याबाबत, तर बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होण्याबाबत अद्याप शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आलेले नाहीत. यामुळे या पाचही ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ठरल्यानुसार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

पुणे शहरालगतची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर जोरदार हलचाली सुरू आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात अंतिम आदेश येतील अशी देखील चर्चा आहे. या २३ गावांपैकी हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हांडेवाडी आणि वडाची वाडी या तीन ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होणार आहे. परंतु अद्याप या पाचही ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत.

यामुळे या पाचही ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत. शासन आथवा राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही स्वरूपाचे आदेश आले तरी निवडणूक प्रक्रिया आहे तेथे थांबवता अथवा रद्द करता येऊ शकते असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Web Title: Election sword hanging over five gram panchayats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.