खेड तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:36+5:302021-01-15T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. मतदान केंद्रावर सर्व यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारांची आता धाकधूक वाढू लागली आहे. शुक्रवार दि. १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी गावनिहाय जमा केली जाणार आहे.
८० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान साहित्य वाडा रस्त्यावरील खांडगे लाॅन्स मंगल कार्यालयातून ३५ एसटी बसेसमधून १२०० कर्मचारी दुपारी १२ वाजता धानोरी गावाकडे रवाना झाले. दीड वाजता पश्चिम भागातील धामणगाव खुर्द येथील शेवटचे मतदान केंद्र रवाना झाले.
तालुक्यातील एकुण २४४ प्रभागातील ४९५ जागांसाठी ११०४ उमेदवारांची मतदानातुन मतदार भुमिका पार पडणार असले तरी कोणाचे नशिब उजाळणार आणि कोणाचे नशिब उजाडणार हे मतदार राजा आता मतदान दाखवुन देणार आहे.