मतदारांना मंचरला इस्त्रीचे
By admin | Published: August 4, 2015 03:54 AM2015-08-04T03:54:53+5:302015-08-04T03:54:53+5:30
थील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अपक्ष उमेदवार कारमधून इस्त्रीचे वाटप करीत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले
मंचर : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अपक्ष उमेदवार कारमधून इस्त्रीचे वाटप करीत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कारसह २५ ते ३० इस्त्री पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग ५ मधील अपक्ष उमेदवार गणेश
खानदेशे व इतर कार्यकर्ते यांना इस्त्रीचे वाटप करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडले. रविवारी प्रचार संपल्यानंतर सायंकाळी
हा प्रकार घडला.
शिवसेना कार्यकर्ते राजाराम बाणखेले, दत्तात्रय खानदेशे, रामदास थोरात, नामदेव मोरे व इतर ५ ते १० कार्यकर्ते यांनी कार (एमएच १४-ईएच ९५५६) अडविली. यात खानदेशे व इतर सहकारी गाडीतून निवडणूक आचारसंहितेदरम्यान मतदारांना आमिष दाखविण्यासाठी इस्त्री वाटत होते.
शिवसेना कार्यकर्त्यांनी ही गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तीत २५ ते ३० इस्त्री आढळल्या. या घटनेचे व्हिडीओ शुटिंग करून घेण्यात आले आहे.
याबाबतची नोंद मंचर पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत करण्यात आली आहे. ती कार पोलिसांनी ताब्यत घेतली असून, चालक बाळासाहेब दशरथ गांजाळे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)