खराडीमध्ये विद्युत वाहिनीत स्फोट, एक जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 06:38 PM2018-09-25T18:38:32+5:302018-09-25T18:45:39+5:30
खराडीत एसबीआय बिल्डींग समोर पाऊस आल्याकारणाने तेथील शेडच्या बाजूला उभे राहिले असताना महावितरण विद्युत विभागाच्या रस्त्यावरील विद्युत वाहिनीतून स्फोट झाला.
पुणे : खराडीत एसबीआय बिल्डींग समोर पाऊस आल्याकारणाने तेथील शेडच्या बाजूला उभे राहिले असताना महावितरण विभागाच्या रस्त्यावरील विद्युत वाहिनीत स्फोट झाला. या स्फोटात इसाक शेख (वय ४०) यांचा डावा हातासह शरीराचा इतरही भाग भाजला आहे.याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात महावितरणच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. शेख यांच्यावर चंदननगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
मे महिन्यात खराडीतील झेन्सार कंपनीसमोर उघड्यावर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. अन या स्फोटात दोन तरूण तरूणींचा अभियंताचा होरपळून उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रियका झगडे(वय-२४ रा.सातारा) व मुलगा पंकज खुणे(वय-२५ रा.वर्धा) असे या दोन मृत्यूमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत. ही घटना ताजी असताना पुन्हा खराडीतील झेन्सार आयटी पार्क पदपथावरील केबलचा स्फोट होऊन तरूणाचा हात भाजला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शेख हे २० तारखेला गणपती विसर्जन दरम्यान रात्री १ वाजता त्यांच्या मंडळाची मिरवणुक पुढे जात असताना झेन्सार कंपनी समोरील एसबीआय बेल्डींग समोर पाऊस आल्या कारणाने तेथील शेड च्या बाजूला उभे राहीले असताना सदर शेड लगत महावितरण विद्युत विभागाची रस्त्यावरच विद्युत वाहिनीतुन स्फोट झाला. वडगावशेरी परिसरात सातत्याने महावितरण संबंधित आगीच्या घटना घडत आहे. याप्रकरणी महावितरणच्या विद्युत उपअभियंता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.
....................
उघड्यावरील महावितरणच्या स्फोटात डावा हात पूर्णपणे भाजुनही महावितरणचे अधिकारी माझ्यावर पोलिसांत तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकत होते. अधिकार्यांच्या चुकीमुळच दोन महिन्यांपूर्वी दोघांचा बळी गेला. इसाक महमद शेख,स्फोटातील जखमी
......................
वडगावशेरी उपविभागीय कार्यालयातील अधिकारी नागरिकांसोबात असभ्य वर्तन करतात. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने कल्याणीनगर येथील महावितरणाच्या कार्यालयात आम्ही आंदोलन केले होते. सातत्याने अशा घटना घडत असताना महावितरणने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.- कल्पेश यादव, शहराध्यक्ष मनविसे