इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांना पुणेकरांची मिळतेय पसंती; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 11:27 AM2020-10-26T11:27:06+5:302020-10-26T11:39:49+5:30

लॉकडाऊनचे तीन महिने विक्री बंद असूनही इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांची विक्री मागील वर्षीपेक्षा लक्षणीय वाढल्याचे दिसते.

Electric, CNG vehicles are popular among Pune residents; Increase in sales compared to the previous year | इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांना पुणेकरांची मिळतेय पसंती; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ 

इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांना पुणेकरांची मिळतेय पसंती; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ 

Next
ठळक मुद्देइलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने दुचाकीला अधिक मागणी सीएनजीमध्ये प्रामुख्याने रिक्षा, बसला मागणी

पुणे : अनलॉकमध्ये वाहन विक्रीमध्ये वाढ होत असून आतापर्यंत पुण्यातील हा आकडा लॉकडाऊनपूर्वीच्या विक्रीच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत पोहचला. पण यामध्ये इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांची विक्री पेट्रोल व डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १००४ इलेक्ट्रिक तर ४३१ सीएनजीव वाहनांची विक्री झाली होती. यावर्षी लॉकडाऊनमध्ये वाहन विक्री ठप्प असूनही काही महिन्यांतच ही संख्या अनुक्रमे ९१७ व १३३६ पर्यंत गेली आहे.

लॉकडाऊनमध्ये जवळपास तीन महिने वाहन विक्री ठप्प होती. मागील चार महिन्यांपूर्वी विक्रीला सुरूवात झाल्यानंतर अत्यंत कमी प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली. हळूहळू ही विक्री वाढू लागली आहे. लॉकडाऊनपूर्वी सुमारे २० हजार वाहनांची दरमहा विक्री होत होती. सध्या हे प्रमाण १० हजारांच्या जवळपास आहे. प्रामुख्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री अधिक आहे. पण त्यामध्येही इलेक्ट्रिक व सीएनजी वरील वाहनांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढली असल्याचे दिसते.

केंद्रीय वाहन प्रणालीच्या डॅशबोर्डनुसार, वर्ष २०१८ मध्ये पुण्यात ४८६ इलेक्ट्रिक व ४९ सीएनजी वाहनांची विक्री झाली होती. २०१९ मध्ये ही विक्री अनुक्रमे १००४ व ४३१ पर्यंत वाढली. तर २०२० मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत ९१७ व १३३६ पर्यंत गेली आहे. लॉकडाऊनचे तीन महिने विक्री बंद असूनही हा आकडा मागील वर्षीपेक्षा लक्षणीय वाढल्याचे दिसते. बाजारात विविध कंपन्यांकडून नवीन मॉडेल आणली जात आहेत. या वाहनांच्या किंमतीही हळुहळू कमी होत आहेत. तसेच प्रदुषणविरहित इंधनामुळे लोकांचे आकर्षण वाढत असल्याचे निरीक्षण परिवहन अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले आहे.
---------------------
मागील तीन वर्षांतील वाहन विक्रीची स्थिती (एमएच १२)
वाहन                     २०१८           २०१९              २०२० (२१ ऑक्टो.पर्यंत)
इलेक्ट्रिक                 ४८६            १००४               ९१७
सीएनजी                  ४९             ४३१                 १३३६
डिझेल                    ३५,१०६      ३२०४९              १३४३२
पेट्रोल                    २,१४,३८०    १,८७,५४३          ८१,४००
--------------------------------------------------
वर्ष २०२० मधील विक्री (एमएच १२)
वाहन          ऑक्टोबर    सप्टेंबर        ऑगस्ट       जुलै
इलेक्ट्रिक       ८१            १५७            १३६            ४३
सीएनजी       ८५             २१२            १६५           ११२
-------------------------------------------------
एकुण वाहन विक्री (एमएच १२)
२०२० (२१ ऑक्टो.पर्यंत) - १,०७,२०३
२०१९ - २,४४,८४०
२०१८ - २,७८,६३३
--------------
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने दुचाकीला अधिक मागणी आहे. कंपन्यांकडून नवीन मॉडेल बाजारात आणली जात आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे नागरिकांनाही आकर्षण वाटत आहे. ज्यांच्याकडे चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे, ते इलेक्ट्रिक वाहने घेत आहेत. सीएनजीमध्ये प्रामुख्याने रिक्षा, बसला मागणी आहे. या वाहनांची विक्रीही वाढत आहे.
- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
------------

Web Title: Electric, CNG vehicles are popular among Pune residents; Increase in sales compared to the previous year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.