वीजबिल भरणा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:36+5:302021-06-19T04:08:36+5:30
पुणे : चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे ...
पुणे : चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. १९) व रविवारी (दि. २०) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सध्या संचारबंदी शिथील करण्यात आल्याने वीज बिल केंद्रांमध्ये जाऊन वीज बिल भरण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध झाली आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल ॲफ किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.