स्वातंत्र्यानंतर दऱ्यावाडीच्या घरामध्ये प्रथमच वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:10+5:302021-06-19T04:08:10+5:30
माजी आ. वल्लभ बेनके यांच्या कारकिर्दीत तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात अनेक ठिकाणी रस्ते, वीज, पाणी अशा सोयीसुविधा पोहोचविण्यात आल्या. ...
माजी आ. वल्लभ बेनके यांच्या कारकिर्दीत तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात अनेक ठिकाणी रस्ते, वीज, पाणी अशा सोयीसुविधा पोहोचविण्यात आल्या. परंतु देवळे गावातील दऱ्यावाडी या अतिदुर्गम भागात वीजपुरवठा काम अपूर्ण होते. गेल्या वर्षभर या कामाचा आढावा घेताना आ. अतुल बेनके यांनी दऱ्यावाडीमधील घरांत वीज सुविधा पोहोचविण्याचा निर्णय घेतला.
या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या टीएसपी योजनेअंतर्गत १८.५८ लक्ष रु. निधी खर्चून करून या भागात १.३ किमी. लांबीची उच्चदाब वाहिनीसह १९ पोल उभे केले. तसेच २.६५ किमी. लांबीची लघुदाब वाहिनी ज्यावर ५६ पोल उभे केले. तसेच ६३ के.व्ही.ए. क्षमतेचे एक रोहित्र याठिकाणी बसविण्यात आले आहे. हे सर्व काम महावितरणचे कार्यकारी अभियंता नारखेडे आणि सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने झाले आणि दऱ्यावाडी लखलखीत झाली, अशी माहिती आ. बेनके यांनी दिली.
हा सुर्वणसोहळा पाहण्यासाठी दऱ्यावाडी ग्रामस्थासह आ. अतुल बेनके यांच्यासह बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, जि. प. सदस्य देवराम लांडे, भाऊसाहेब देवाडे, तुळशीराम भोईर, काळूशेठ शेळकंदे, मारुती वायाळ, देवराम नांगरे गुरुजी, माउली लांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता नारखेडे, उपअभियंता आनंद घुले, तहसीलदार हनुमंत कोळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, किरण आरोटे आदी होते.
देवळे गावातील दऱ्यावाडीमधील घरात प्रथमच वीजपुरवठा सुरू झाला. या वेळी आदिवासी महिलेसह आ. अतुल बेनके, सभापती संजयराव काळे, जि. प. सदस्य देवराम लांडे, भाऊसाहेब देवाडे, तुळशीराम भोईर, काळूशेठ शेळकंदे, मारुती वायाळ आदींसह मान्यवर.