कौतुकास्पद ! रात्रीच्यावेळी सलग दहा तास काम करून ११० गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 03:56 PM2020-04-02T15:56:22+5:302020-04-02T16:00:44+5:30

वादळी वाऱ्यासह पावसामुळे ११० गावातील ७ हजार ६०० कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित

electricity supply started of 110 villages doing Working ten hours a night in Bhor taluka | कौतुकास्पद ! रात्रीच्यावेळी सलग दहा तास काम करून ११० गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

कौतुकास्पद ! रात्रीच्यावेळी सलग दहा तास काम करून ११० गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

Next
ठळक मुद्देमहावितरणचे अभियंता,कर्मचाऱ्यांची कामगिरी

भोर : तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीसगाव चाळीसगाव व हिडोर्शी खोऱ्यातील ११० गावांचा आणि ७ हजार ६०० कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, देशात कोरोनाची आपत्ती सुरु असताना महावितरणच्या अभियंत्यांनी आणि जनमित्र कर्मचाऱ्यांनी एका रात्रीत १० तास सलग काम करून वीजपुरवठा सुरळीत करुन अंधारात बसलेल्या नागरिकांना दिलासा दिला. 
  महापारेषणच्या भोर तालुक्यातील १३२/३३ केव्ही कामथडी अतिउच्चदाब उपकेंद्रातुन निघणा-या ३३ केव्ही निरादेवघर या उच्चदाब वीज वाहिनीव्दारे खानापुर, निगुडघर येथील दोन उपकेंद्रांना जलविद्यूत वीज निमिती केंद्रांतंर्गत येणा-या हिडोर्शी वीसगाव खो-यातील ११० गावातील ७६०० वीजग्राहक कुटुंबांना वीज पुरवठा केला जातो.  मंगळवारी कापुरव्होळ, कामथडी कासुर्डी या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणच्या  ३३ केव्ही उच्चदाब निरादेवघर वीज वाहिनी कोसळली. त्यामुळे वीजवाहिच्या बारा गाळयातील तीनपैकी एक वाहिनी जमिनदोस्त झाली. तर चार पीन इन्सुलेटर,२ डिस्क इन्सुलेटर फुटले. यामुळे खानापुर आणी निगुडघर वाहिनीवरील वीजपुरवठा खंडीत झाल्याने दुर्गम डोंगरी भागातील गावे अंधारात गेली.
  एकाबाजुला कोरोनाचा थौमान सुरु असताना महावितरणचे सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे आणि भोरचे उपकार्यकारी अधिकारी संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता सचिन कुलकर्णी यांनी ४१ जनमित्रांच्या मदतीने पाहणी करुन सुमारे ६३ किलोमीटर लांबीच्या उच्चदाब वीज वाहिनीच्या पयार्यी वीजपुरवठ्याची सोय नसल्याने तातडीने दुरुस्तीची गरज होती. त्यामुळे जनमित्रांसह ठेकेदार मारुती कंक यांचे १८  कामगार बोलावुन केवळ् बटरी आणि मोबाईलच्या प्रकाशात शेतातील पावसाने झालेल्या चिखलात रात्री ९ वाजता काम सुरु केले. रात्रभर १० तास सलग काम करुन वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पुर्ण केले. यामुळे निरादेवघर जलविद्यूत केद्रांचा वीज पुरवठा पुर्ववत झाला. आणि अंधारातील गावे प्रकाशमान झाली.
कोट 
 महावितरणच्या अभियंता आणि कर्मचारी, ठेकेदाराचे कर्मचारी यांच्या या कामगिरीचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनिल पावडे बारामती मंडलचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी कौतुक केले आहे. मोठ्या प्रमाणात पावसाने ६३ कि.मी लांबीच्या उच्चदाब वीजवाहिनी तुटली होती. शेतात सर्वत्र चिखल होता. अंधारात होता त्यामुळे काम करणे अवघड होते.मात्र, शाखा अभियंता जनमित्र आणी ठेकेदाराच्या कामगारांनी केवळ १० तासात न होणारे अवघड काम करुन ११० गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला.    
  - संतोष चव्हाण, भोर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता

Web Title: electricity supply started of 110 villages doing Working ten hours a night in Bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.