बैलगाडा मालकांचा एल्गार, राज्यव्यापी आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:04 AM2017-10-24T01:04:07+5:302017-10-24T01:04:16+5:30

मंचर : बैलगाडाप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडा मालकांचे चाकण येथे शनिवारी (दि. २८) राज्यव्यापी आंदोलन होणार आहे.

Elephant of bullock-owner, state-wide agitation will attract government attention | बैलगाडा मालकांचा एल्गार, राज्यव्यापी आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधणार

बैलगाडा मालकांचा एल्गार, राज्यव्यापी आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधणार

Next

मंचर : बैलगाडाप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडा मालकांचे चाकण येथे शनिवारी (दि. २८) राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. हे आंदोलन पक्षविरहित असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले.
लांडेवाडी येथे सर्वपक्षीय बैलगाडा मालकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये तळेगाव चौक, चाकण येथे शनिवारी करण्यात येणाºया रास्ता रोको आंदोलनाची दिशा ठरवून नियोजनाकरिता तालुकानिहाय समित्या बनविण्यात आल्या.
या वेळी उपस्थित बैलगाडा म खासदार आढळराव-पाटील म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी पक्षीय मतभेद, राजकारण बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून चाकण येथील आंदोलन यशस्वी करणार आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारशी बोलून संसदेत हे विधेयक मंजूर करून घेतले पाहिजे. संसदेने वटहुकूम काढल्यानंतर बैलगाडा शर्यतीला कोणीही अटकाव करू शकत नाही. राज्यातील बैलगाडा मालक, वाजंत्री आणि यात्रा-उत्सवांतील व्यावसायिक आंदोलनाप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. हे बेमुदत आंदोलन असल्याने घाबरण्याचे कारण नाही. गुन्हे दाखल झाले तरी सर्वप्रथम मी पुढे राहीन. ’’
या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विलास भुजबळ, प्रकाश कबाडी, अण्णासाहेब भेगडे, मुुकुंद बोºहाडे, अशोक मोढवे, विलास थोरात, शांताराम भैये, मयूर वाबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Elephant of bullock-owner, state-wide agitation will attract government attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.