तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच मंजुरी- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:41 PM2023-12-22T12:41:39+5:302023-12-22T12:42:11+5:30

याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती दिली....

Elevated road between Talegaon-Chakan-Shikrapur to be approved soon- Nitin Gadkari | तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच मंजुरी- नितीन गडकरी

तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच मंजुरी- नितीन गडकरी

पिंपरी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशीच परिस्थिती देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान असते. या मार्गांवरील कोंडी कमी होत नाही. आता तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळणार आहे. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती दिली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात गुरुवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन रस्त्यांबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला. खासदार बारणे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून देहूरोड सेंट्रल चौक-किवळे-वाकड-चांदणी चौक मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडणाऱ्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. यामुळे तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी येथे जाणारी अवजड वाहने, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून मुंबई-बंगळुरू महामार्गाकडे जाणारी वाहने वाहतूककोंडीत अडकून पडतात. या दोन्ही मार्गांवरील कामाला मंजुरी कधी मिळेल आणि काम कधीपर्यंत सुरू होईल?

त्यांच्या प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले. गडकरी म्हणाले, या भागातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दरम्यान उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्याचे डिझाईन बनवण्यात आले असून डीपीआरदेखील तयार झाला आहे. तो डीपीआर दिल्ली येथे मंजुरीसाठी आला आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे.

Web Title: Elevated road between Talegaon-Chakan-Shikrapur to be approved soon- Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.