जिल्ह्यातील अकरा धरणे लवकरच पूर्ण भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:45+5:302021-07-26T04:09:45+5:30
पुणे : जिल्ह्यात जवळपास आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अकरा धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांमध्ये साधारण ८० ...
पुणे : जिल्ह्यात जवळपास आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अकरा धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांमध्ये साधारण ८० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा जमा झाला आहे. येत्या चार-पाच दिवसांत ही धरणे भरतील, अशी स्थिती आहे.
खडकवासला, कळमोडी, वडीवळे आणि आंध्रा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून ३१०६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर कळमोडी १८८४ क्युसेक, वडिवळे २९३ क्युसेक, तर आंध्रा धरणातून १४६२ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वीर ९३.२१ टक्के, कासारसाई ८५.०६ टक्के, निरा देवघर ८३.७३ टक्के, गुंजवणी ८२.८४ टक्के, पानशेत ८०.५२ टक्के, भामा आसखेड ७५.९१ टक्के, पवना ७४.६५ टक्के, चासकमान ७०.४३ टक्के, वरसगाव ७०.१५ टक्के, मुळशी ६३.१२ टक्के, डिंभे ५९.९९ टक्के, येडगाव ५७.७८ टक्के, भाटघर ५७.५९ टक्के, टेमघर ५७.५९ टक्के, तर वडज ४६.४५ टक्के भरली आहेत.
-----
उजनी धरणात २५.२६ टक्के पाणीसाठा जमा
पुणे, सोलापूर, अहमदनगरचा काही भाग तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २५.२६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. बंडगार्डन पुल येथून १७ हजार ४७२ क्युसेक, तर दौंड येथून ४७ हजार ८१४ क्युसेक पाण्याच्या विसर्ग उजनी धरणात येत आहे.
------
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहिती
धरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी
टेमघर ३.७१ २.१४
वरसगाव १२.८२ ९.००
पानशेत १०.६५ ७.६९
खडकवासला १.९७ १.६६
पवना ८.५१ ६.३५
कासारसाई ०.५७ ०.४८
मुळशी १८.४७ ११.१०
कळमोडी १.५१ १.५१
चासकमान ७.५८ ५.३४
भामा आसखेड ७.६७ ५.८२
आंध्रा २.९२ २.९२
वडीवळे १.०७ ०.८६
शेटफळ ०.६० ०९
गुंजवणी ३.६९ ३.०६
भाटघर २३.५० १३.५४
नीरा देवघर ११.७३ ८.९४
वीर ९.४१ ८.७७
नाझरे ०.५९ ०.०६
पिंपळगाव जोगे ३.८९ ०.००
माणिकडोह १०.१७ ३.०७
येडगाव २.८० १.१२
वडज १.१७ ०.५४
डिंभे १२.४९ ७.४९
चिल्हेवाडी ०.९६ ०.६२
घोड ५.४७ १.१६
विसापूर ०.९० ०.०७
उजनी ५३.५७ १३.५३