घरी राहूनही एकाच कुटुंबातील अकरा सदस्यांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:51+5:302021-04-28T04:12:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुटुंबातील सर्वच सदस्यांना खोकला, सर्दी, अंगदुखी आदी लक्षणे आढळून आल्याने, कुटुंबातील बाराही सदस्यांची कोरोना ...

Eleven members of the same family overcame Kelly Corona while staying at home | घरी राहूनही एकाच कुटुंबातील अकरा सदस्यांनी केली कोरोनावर मात

घरी राहूनही एकाच कुटुंबातील अकरा सदस्यांनी केली कोरोनावर मात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कुटुंबातील सर्वच सदस्यांना खोकला, सर्दी, अंगदुखी आदी लक्षणे आढळून आल्याने, कुटुंबातील बाराही सदस्यांची कोरोना चाचणी करून घेतली. ११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, यात माझे ७६ वर्षीय वडील व ६५ वर्षीय आईही होती. घरातील सर्वच जण पॉझिटिव्ह आल्याने आता पुढे काय असा प्रश्न पडलाही. परंतु, महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांनी आम्हाला न घाबरता घरी राहण्याचा सल्ला दिला. योग्य आहार व औषोधोपचार यामुळे माझ्या कुटुंबातील ११ सदस्यांनी १४ दिवसातच कोरोनावर मात केली आहे.

औंध येथील आनंद विनायक जुनवणे यांच्या कुटुंबाने कोरोनाला न घाबरता होम क्वारंटाईनमध्ये (गृह विलगीकरणात) राहूनही पराभूत केेले. आनंद जुनवणे वगळता घरातील अन्य ११ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले. एकाच वेळी सर्वच जण पॉझिटिव्ह आल्याने काही काळ खचलो गेलो. परंतु, खेडेकर हॉस्पिटलमधील डॉ. स्वाती बढिये यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज प्रकृतीच्या नोंदी घेऊन त्या डॉक्टरांना कळविल्या. त्यांच्या सल्ल्यानुसार विश्रांतीसह योग्य आहार, औषोधोपचार घेऊन आम्ही १४ दिवसात कोरोनामुक्त होऊ शकलो.

आनंद जुनवणे यांचे वडील विनायक जुनवणे (वय ७६), आई शोभा (वय ६५), पत्नी भारती (वय ४३), बंधू रत्नाकर (वय ४३), वहिनी योगता (वय ३५), मुलगा ओंकार (वय २३), मुलगी रिद्धी (वय १७) यांच्यासह पुतनी तन्वी (वय १५) व तनिष्का (वय 10), बहिण योगिता गणेश फुगे (वय ४८) व भाचा आजिक्य (वय २५) या सर्वांनी सहा दिवस एकत्र घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

----------------

कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर होम क्वारंटाईन झालेल्या या कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ असलेल्या ७६ वर्षीय विनायक जुनवणे यांना सहा/ सात दिवसांनी खोकला वाढल्याने खबरदारी म्हणून दवाखान्यात हलविण्यात आले. शुगरचा त्रास व एचआरसीटी स्कोर १५ असूनही त्यांनी मात्र सात दिवसात कोरोनावर मात करून दाखविली. आपल्यामध्ये प्रबल इच्छाशक्ती असल्यास व आजाराला आपण घाबरून न जाता सकारात्मक विचार केला तर नक्कीच आजारातून मुक्त होतो, अशा भावनाही विनायक जुनवणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

-----------------

दररोजच्या नोंदी व डॉक्टरांचे मार्गदर्शन

कोरोनाबाधित झालेले काही जण केवळ घाबरून रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याचा अट्टाहास धरतात. परंतु, रुग्णालयात दाखल होण्याऐवजी घरात विलग राहून योग्य उपचार घेऊन कुटुंबाच्या सहवासात आपण लवकर बरे होऊ शकतो याचा प्रत्यय आम्हाला आला आहे.

होम क्वारंटाईन असताना प्रकृतीतील रोजच्या बदलच्या नोंदी, दिवसातून चार वेळा ऑक्सिजन पातळी तपासणी करून त्याची नोंद केली व त्याची माहिती डॉक्टरांना दिली. यामुळे योग्य उपचार पध्दती आम्हाला मिळाली असल्याचे रत्नाकर विनायक जुनवणे यांनी सांगितले़

------------------

कोट :-

कोरोना झाला म्हणून घाबरून न जाता, योग्य वेळी उपचार घेऊन होम क्वारंटाईन राहूनही सकारात्मक विचाराधारेतून कोरोनामुक्त होता येते, हे जुनवणे कुटुंबियांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून न जाता वेळीच उपचार घ्यावेत व कोरोनावर मात करावी.

डॉ स्वाती बढिये, वैद्यकीय अधिकारी, पुणे मनपा.

-------------------------------

फोटो मेल केला आहे़

१़ सिंगल फोटो := विनायक जुनवणे (वय ७६)

२़ कुटुंबाचा फोटो := रत्नाकर जुनवणे पत्नी व मुलीसह

Web Title: Eleven members of the same family overcame Kelly Corona while staying at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.