निमसाखरमध्ये कोरोनाचे अकरा नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:09+5:302021-05-19T04:11:09+5:30
निमसाखरमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे. सध्या निमसाखरमध्ये ११ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे निमसाखरचे आरोग्यसेवक ...
निमसाखरमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.
सध्या निमसाखरमध्ये ११ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे निमसाखरचे आरोग्यसेवक सुरेश कांबळे यांनी सांगितले. पहिल्या कोरोना लाटेच्या काळात सर्तक असलेले प्रशासन दुसऱ्या लाटेकडे मात्र तितकेसे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसून येते नाही. सध्या निमसाखर व परिसरात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण हे गृहविलगीकरणातच आहेत. हे रुग्ण गृहविलगीकरणात असले तरी काही रुग्ण हवी त्या प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे निमसाखरमधील कोरोना संक्रमीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
निमसाखर येथील बसस्थानक व परिसरात सकाळ संध्याकाळच्या वेळी काही नागरिक विनाकारण फिरत असताना दिसुन येतात. तर सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून असल्याने अनेक सामान्य व्यावसायिकांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत तर दुसरीकडे मद्यविक्रीसह अवैध व्यवसाय मात्र राजरोसपणे सुरू असल्याचेही सांगितले जाते.