कान्हूर मेसाई येथील अकरा विद्यार्थ्यांची महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:36+5:302021-08-01T04:09:36+5:30

कोविडच्या संसर्गामुळॆ ही परीक्षा उशिरा झाली. तरीही अभ्यासातील सातत्य व शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन यामुळे या परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी यश ...

Eleven students from Kanhur Mesai won the Maharashtra Pragya Shodh examination | कान्हूर मेसाई येथील अकरा विद्यार्थ्यांची महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत बाजी

कान्हूर मेसाई येथील अकरा विद्यार्थ्यांची महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत बाजी

Next

कोविडच्या संसर्गामुळॆ ही परीक्षा उशिरा झाली. तरीही अभ्यासातील सातत्य व शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन यामुळे या परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यामध्ये प्रतीक विलास खैरे (१२५ गुण), प्रवीण तान्हाजी खैरे(१२१ गुण), ऋतुजा मच्छिंद्र दळवी (११९ गुण), ओंकार पंडित उकिर्डे व जयश्री रामदास दळवी (११८ गुण), ओम किसन हरपुडे (११७ गुण) मिळवून विषेश पारितोषिकासाठी पात्र ठरले आहेत. तालुका पारितोषिक धनश्री कैलास नाणेकर (१०७ गुण) व धनश्री धनंजय जाधव (१०७ गुण) यांनी मिळविले आहे. आनम मतीन तांबोळी (१०३ गुण) हे शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.

सर्व विद्यार्थ्यांना यशवंत टकले, धनंजय तळोले, सीताराम मोहिते, अविनाश दौंडकर, साहेबराव आंधळे, दगडू दंडवते, बेबीनंदा केंदळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक रामकृष्ण पुंडे यांनी रोख १२०० रुपये देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष जी. के. पुंडे माजी अध्यक्ष भास्करराव पुंडे व ग्रामपंचायत कान्हूर मेसाईच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

--

Web Title: Eleven students from Kanhur Mesai won the Maharashtra Pragya Shodh examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.