‘ससून’मध्ये अकरा हजार जन्म, तर बारा हजार मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:33+5:302021-09-08T04:14:33+5:30
चौकट २ यंत्रणा उभी, ‘आयडी पासवर्ड’ची प्रतीक्षा ‘ससून’मध्ये जन्म दाखल्यांचे वितरण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली आहे. याकरिता महापालिकेने दोन ...
चौकट २
यंत्रणा उभी, ‘आयडी पासवर्ड’ची प्रतीक्षा
‘ससून’मध्ये जन्म दाखल्यांचे वितरण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली आहे. याकरिता महापालिकेने दोन संगणक, दोन प्रिंटर, दोन स्कॅनर, आवश्यक स्टेशनरी व जन्म प्रमाणपत्रासाठी २० हजार आवश्यक बारकोड असलेले कागद ससूनला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले आहेत. या साधनसामग्रीसह येथील यंत्रणा व स्वतंत्र विभाग सज्ज झाला. शासनाकडून जन्म-मृत्यू नोंदीसाठीचा संकेतस्थळाकरिताचा आयडी व पासवर्ड आला की यंत्रणा येत्या आठवड्यापासून कार्यरत होईल असे ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ससूनमधील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात पहिल्या टप्प्यात केवळ जन्म दाखले देण्यात येणार आहेत. कालांतराने ससूनमध्ये मयत झालेल्यांचे मृत्यू दाखलेही दिले जातील.
--------------------
चौकट ३ :-
महापालिकेकडून वितरण बंद
“ससून सर्वोपचार रुग्णालयात होणाऱ्या जन्म-मृत्यू घटनांच्या नोंदी व दाखले यांचे वितरण तेथूनच होणार असल्याने, पुणे महापालिकेने १ सप्टेंबर, २०२१ पासून ससूनमध्ये होणाऱ्या जन्माचे दाखले कसबा पेठ कार्यालयातून देणे बंद केले आहे. मात्र, ससूनमधील यंत्रणा सुरू होईपर्यंत तरी महापालिकेने जन्म दाखले द्यावेत अशी विनंती ससून प्रशासनाने महापालिकेला केली आहे. त्यानुसार येत्या १५ सप्टेंबरपर्यंत हे दाखले देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे.”
-डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा.