अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:36+5:302021-08-14T04:15:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सन २०२१-२२ साठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सीईटी लागू करण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सन २०२१-२२ साठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सीईटी लागू करण्यात आली होती. मात्र, सीईटी रद्द करण्यात आली असून उच्च न्यायालयाने अकरावीचे केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील अकरावी प्रवेशाची कार्यवाही शनिवारपासून (दि. १४) सुरू करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे, पसंतीक्रम देणे, प्रवेशफेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत पहिल्या फेरीसाठी तपशील वेळापत्रकांमध्ये देण्यात आला आहे, असे अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियचे सदस्य सचिव तथा सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर यांनी सांगितले आहे.
----
पाॅईंटर्स
* १४ ऑगस्ट :- ऑनलाइन नोंदणी
* १७ ऑगस्ट :- उपलब्ध जागांची यादी जाहीर करणे, पसंतीक्रम निवडणूक अर्ज सादर करणे
* २३ ऑस्ट :- जनरल कॅटेगिरीतील यादी जाहीर करणे, हरकती-सूचना, चुकांमध्ये सुधारणा करणे
* २५ ऑगस्ट :- रिक्त जागांची यादी तयार करणे
* २७ ऑगस्ट :- कनिष्ठ महाविद्यालयांची विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चिती जाहीर करणे,
* ३० ऑगस्ट :- कनिष्ठ महाविद्यालयांननी प्रवेशाची स्थिती सादर करणे.
* ३० ऑगस्ट :- रिक्त जागांची यादी सादर करणे (दुसरी फेरी)
* ३१ ऑगस्ट :- नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची दुसरी फेरी
* ५ सप्टेंबर :- नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तिसरी फेरी
* १२ सप्टेंबर :- विशेष प्रवेशाची चौथी फेरी