अकरावी प्रवेशाला ९ ऑगस्टपासून सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:44+5:302021-07-27T04:11:44+5:30

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाकडून (प्रवेश पूर्व परीक्षा)सीईटी घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा बंधनकारक नसली तरी प्रथमत: ...

Eleventh admission starts from 9th August | अकरावी प्रवेशाला ९ ऑगस्टपासून सुरूवात

अकरावी प्रवेशाला ९ ऑगस्टपासून सुरूवात

Next

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाकडून (प्रवेश पूर्व परीक्षा)सीईटी घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा बंधनकारक नसली तरी प्रथमत: सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. सीईटीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रवेशाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सूकता होती. मात्र, माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे.

--------------

केंद्रीय प्रवेश फेरीतून ८५ टक्के प्रवेश दिले जाणार आहेत.तर १० टक्के प्रवेश इन हाऊस कोट्यांतर्गत आणि व्यवस्थापन कोट्यातून ५ टक्के प्रवेश दिले जाणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) , पुणे पिंपरी-चिंचवड ,नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहरांमधील राज्य मंडळ संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, उर्वरित ठिकाणीच्या प्रवेशासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा,असेही टेमकर यांनी स्पष्ट केले.

---------------------------

कशी राबवणार प्रवेश प्रक्रिया

* विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येणार

* केंद्रीय प्रवेश फे-याद्वारे अ‍ॅलोटमेंटनुसार होणार प्रवेश

* कोट्यांतर्गत राखीव जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून मिळणार प्रवेश

* अर्जाच्या दुस-या भागात किमान १ व कमाल १० पसंतीक्रम भरता येईल.

* कनिष्ठ महाविद्यालयांनी १ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी करणे.

* विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास ९ ऑगस्टपासून सुरूवात करणे.

-------------------------------

अर्ज भरण्याचा सराव

विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये.तसेच विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्याचा सराव व्हावा,या उद्देशाने येत्या १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत डमी लॉगईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.मात्र,प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात होण्यापूर्वी ही माहिती नष्ट केली जाईल,असेही टेमकर यांनी स्पष्ट केले.

-----------------

Web Title: Eleventh admission starts from 9th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.