जेजुरीत आंदोलनाचा अकरावा दिवस; देवाचा जागर करून महालक्ष्मी मंडळाचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 03:52 PM2023-06-05T15:52:14+5:302023-06-05T15:54:22+5:30

उद्या बैलगाडी शेतकऱ्याच्या वेशात आणि शेतात वापरली जाणाऱ्या अवजारे यांच्यासह आंदोलन केलं जाणार

Eleventh day of protest in Jejuri; Movement of Mahalakshmi Mandal by awakening God | जेजुरीत आंदोलनाचा अकरावा दिवस; देवाचा जागर करून महालक्ष्मी मंडळाचे आंदोलन

जेजुरीत आंदोलनाचा अकरावा दिवस; देवाचा जागर करून महालक्ष्मी मंडळाचे आंदोलन

googlenewsNext

जेजुरी : श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत जेजुरी देवसंस्थान ट्रस्ट वर बाहेरील विश्वस्त नियुक्त केल्याच्या निषेधार्थ जेजुरी कर ग्रामस्थांच्या वतीने सलग अकरा दिवस धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. अकराव्या दिवशी महालक्ष्मी मित्र मंडळाच्या वतीने एकतारी भजन व देवाचा जागर करून आंदोलन करण्यात आले. यावेळी देवाचे मानकरी असणाऱ्या माळी समाजाच्या वतीने या आंदोलनाला निवेदन देऊन पाठिंबा देण्यात आला. 

जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्त पदी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्थानिकांना प्राध्यान्य न देता बाहेरील विश्वस्त नियुक्त केल्याने जेजुरीकर ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांच्या वतीने या नियुक्तीच्या निषेधार्थ गेली अकरा दिवस आंदोलन सुरू ठेवले आहे. धरणे आंदोलनाच्या अकराव्या दिवशी शहरातील महालक्ष्मी मित्र मंडळाच्या वतीने पारंपरिक एकतारी भजन व देवाचा जागर करून आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान श्री खंडोबा देवाचे मानकरी असणाऱ्या माळी समाजाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा निवेदनद्वारे देण्यात आला. 

जेजुरी येथे ग्रामस्थांचे विश्वस्त निवडी विरोधात आज आकराव्या दिवशी धरणे आंदोलन सुरू आहे. सकाळी ग्रामस्थांच्या वतीने विश्वस्त निवडीच्या विरोधात ग्रामस्थांनी बैठक घेतली. काल झालेल्या प्रमुख विश्वस्तांच्या निवडीबद्दल सुद्धा ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय. याआधी अशा पद्धतीने कधीही प्रमुख विश्वस्तांनी चार्ज घेतला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आज धर्मादाय आयुक्तांकडे जेजुरीकरांनी यापूर्वी दिलेल्या पुनर्विचार आर्जावर दुपार नंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील लढाई बरोबरच जेजुरी कर नागरिकांनी न्यायालयीन लढाई सुद्धा आजपासून सुरू होतोय. उद्या बैलगाडी शेतकऱ्याच्या वेशात आणि शेतात वापरली जाणाऱ्या अवजारे यांच्यासह आंदोलन केलं जाणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. 

Web Title: Eleventh day of protest in Jejuri; Movement of Mahalakshmi Mandal by awakening God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.