अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:07 AM2018-05-10T02:07:41+5:302018-05-10T02:07:41+5:30
अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे.
पुणे - अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर नेमून दिलेल्या केंद्रावर जाऊन अर्ज भरावयाचा आहे.
अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माहितीपुस्तिकांचे सर्व माध्यमिक शाळांमध्ये वितरण करण्यात आले आहे. या माहितीपुस्तिकेमधील युजर आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. या ...... संकेतस्थळावर प्रवेश अर्जातील भाग १ आॅनलाइन भरण्यासाठी लिंक गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या सहायक संचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्येच आॅनलाइन अर्ज भरून तो मुख्याध्यापकांकडून अॅप्रुव्ह करून घ्यावा लागेल. मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या अकरावी आॅनलाइन अर्ज भरण्याचे नियोजन करायचे आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घेऊन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे. १० मेपासून एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल लागेपर्यंत मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांना दहावीत मिळालेले गुण व टक्केवारी आणि त्यांना हवे असलेले महाविद्यालय आदी माहितीचा भाग २ भरावा लागणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील राज्यातील इतर शहर व गावांमधील एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील १० दिवसांच्या आत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व भाग २ भरता येणार आहे. त्यासाठी त्यांना माहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. त्या वेळी त्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, वैधानिक व विशेष आरक्षणाबाबत आवश्यक कागदपत्रे आदी सोबत घेऊन मार्गदर्शन केंद्रावर जायचे आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे.
निकालानंतर भाग २ भरावा लागणार
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील विद्यार्थ्यांनी आता त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन भाग १ भरायचा आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांना दहावीत मिळालेले गुण व टक्केवारी आणि त्यांना हवे असलेले महाविद्यालय आदी माहितीचा भाग २ भरावा लागणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड बाहेरील गावांमध्ये शिकणाºया एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील १० दिवसांत माहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन भाग १ व भाग २ एकाच वेळी भरायचा आहे.
एसएससी बोर्डाव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी
एसएससी बोर्डा व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई आदी इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह माहिती पुस्तिकेत दिलेल्या अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन प्रवेश अर्ज भरण्याची व अॅप्रूव्ह करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.