अकरावी प्रवेशप्रक्रिया आज संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 05:08 AM2017-09-25T05:08:11+5:302017-09-25T05:08:14+5:30
इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी तब्बल चार महिने सुरू असलेली केंद्रीय प्रवेशप्रक्रिया अखेर सोमवारी (दि. २५) संपणार आहे.
पुणे : इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी तब्बल चार महिने सुरू असलेली केंद्रीय प्रवेशप्रक्रिया अखेर सोमवारी (दि. २५) संपणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची सोमवारी अखेरची संधी असून त्यानंतर ही प्रक्रिया बंद केली जाणार असल्याचे प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविली जात आहे. नियमित चार फेºयांसह दोन विशेष फेºया व एक प्रथम प्राधान्य फेरी अशा एकूण सात फेºया झाल्या आहेत.
सध्या प्रथम प्राधान्याची दुसरी फेरी सुरू असून त्याअंतर्गत प्रवेश घेण्याची सोमवारी अखेरची मुदत आहे. या फेरीत दि. १९ ते २४ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लिक करून रिक्त जागेवर आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रवेशाची लिंक बंद होणार आहे. त्यानंतर प्रवेशासाठी मुदतवाढ दिली
जाणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.