नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:31 AM2018-11-13T00:31:31+5:302018-11-13T00:32:01+5:30

इंदापूर, माळशिरस तालुक्यातील शेतकरी एकवटले : जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

Elgar against the Neera-Bhima River Jodd project | नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाविरोधात एल्गार

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाविरोधात एल्गार

googlenewsNext

इंदापूर : कृष्णा खोऱ्यातील पाणी जोपर्यंत नीरा नदीपर्यंत येत नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात करू नये. नीरा नदीमधून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी एकवटले आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात, दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांची नीरनिमगाव (ता. इंदापूर) याठिकाणी रविवारी ( दि. ११) प्रथम बैठक पार पडली. त्यानंतर अकलूज (जि. सोलापूर) येथे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थित सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात सोमवारी बैठक पार पडली. या वेळी मोहिते-पाटील यांनी दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या उपस्थित आंदोलनाबाबत नियोजन बैठका घेण्यात येतील. या प्रकल्पामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांच्या होणाºया नुकसानीबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत कल्पना देण्यात येणार आहे. सामंजस्याने यातून तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्यायालयातदेखील दाद मागू, असे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ८ टीएमसी पाणी, नीरा नदीमधून भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. कृष्णा खोºयातून नीरा नदीत जोपर्यंत पाणी येणार नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करू नये; अन्यथा त्या नदीजोड प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी जनआंदोलन उभारणार असल्याचे नीरा नदी जल बचाव कृती समितीचे संयोजक दत्तात्रय घोगरे यांनी सांगितले.
या वेळी माजी खासदार विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यामध्ये तर जल बचाव कृती समितीचे नवनाथ अहिवळे, हनुमंत शिंदे, कांतिलाल इंगवले, संजय रुपनवर, महादेव माने, संतोष
स्वामी, ज्ञानदेव वावरे, शशिकांत चांगण आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलआयोगाचाही प्रकल्पाला विरोध...
एका खोºयातून दुसºया खोºयात पाणी नेण्यास जलआयोगाने विरोध केल्यामुळे कृष्णा- नीरा जोड प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच थांबविण्यात आले. या माध्यमातून कृष्णा खोºयातून नीरा नदीत एकूण ५१ टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. त्यानंतर नीरा-भीमा बोगद्यातून भीमा नदीत ४५ टीएमसी पाणी सोडून तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार होते. सध्या कृष्णा-नीरा जोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली नाही, मात्र नीरा-भीमा जोड प्रकल्पाचे काम जोमात चालू असून, ते काम पूर्ण झाल्यानंतर, नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडून, तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीत पाण्याची कमतरता भासून, इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांना पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.

आजी-माजी आमदारांचाही प्रकल्पास विरोध
च्नीरा नदीत जोपर्यंत कृष्णा नदीचे पाणी येणार नाही, तोपर्यंत आम्ही नीरा नदीतून भीमा नदीत
अजिबात पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याने, येणारी विधानसभा पाणीप्रश्नावर होणार याची चर्चा सर्वत्र
रंगली आहे.

Web Title: Elgar against the Neera-Bhima River Jodd project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.