बाललैैंगिक शोषणाविरोधात नाटकातून एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:17 AM2017-08-03T03:17:59+5:302017-08-03T03:17:59+5:30

लहानपणीचे फूलपंखी आयुष्य, आठवणी प्रत्येकालाच हव्याहव्याशा वाटतात आणि आपण या आठवणींमध्ये रमतो. पण, काही जणांच्या बालपणीच्या आठवणी मनावर कायमचे ओरखडे

Elgar from the play against child sexual abuse | बाललैैंगिक शोषणाविरोधात नाटकातून एल्गार

बाललैैंगिक शोषणाविरोधात नाटकातून एल्गार

Next

पुणे : लहानपणीचे फूलपंखी आयुष्य, आठवणी प्रत्येकालाच हव्याहव्याशा वाटतात आणि आपण या आठवणींमध्ये रमतो. पण, काही जणांच्या बालपणीच्या आठवणी मनावर कायमचे ओरखडे उमटवणाºया आणि भविष्य अंधकारमय करणाºया असतात. आपल्या आजूबाजूला अनेक लहान मुले लैैंगिक अत्याचाराला बळी पडतात आणि त्यांचे भावविश्व कोमेजून जाते. याविषयी समाजात फारसे बोलले जात नाही. ‘शाऊट - युअर व्हॉईस मॅटर्स’ या नाटकातून या विषयाला वाचा फोडण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. ४ आॅगस्ट रोजी सुदर्शन रंगमंच येथे सायंकाळी ७ वाजता हे नाटक सादर होणार असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा सहस्रबुद्धे यांच्या बाललैैंगिक शोषणाविरोधात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असणाºया ज्ञानदेवी संस्थेमार्फत नाटकाची निर्मिती करण्यात आली असून, आकांक्षा रंगभूमीने या नाटकाची धुरा सांभाळली आहे. समाजातील मोठा बालवर्ग अत्याचाराच्या घटनांचा बळी ठरत असताना बाल लैंगिक शोषण आजही दुर्लक्षित राहिले आहे. अशा परिस्थितीत समाज, पालक, नागरिक यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे आणि शोषण थांबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, या हेतूने ‘शाऊट’ या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती आकांक्षा रंगभूमीचे दिग्दर्शक सागर लोधी यांनी दिली.
‘शाऊट’ या नाटकासाठी ‘डिव्हाईज्ड थिएटर’ या नव्या नाट्यशैैलीचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये नाटकाचे कथानक, संहिता केवळ एका लेखकाने लिहिलेली नसून, सहभागी कलाकारांच्या दीर्घ काळच्या वाचन, चिंतन, चर्चेतून ती साकारली आहे. नाटकाचा विषय गंभीर असला, तरी रंजक पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाटकात अभिनय, नृत्य आणि संगीताचा मेळ घालण्यात आला आहे. मनोरंजनामधून एक गडद विषय हाताळताना अंतरंग ढवळून निघाल्याचा अनुभव प्रेक्षकांना येईल, अशी अपेक्षाही लोधी यांनी व्यक्त केली.

Web Title: Elgar from the play against child sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.