पात्र शाळांना मिळणार अनुदान, दोन महिन्यात बिंदुनामावली तयार कराण्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:00 AM2020-07-08T06:00:04+5:302020-07-08T06:00:10+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २० टक्के व ४० टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरित करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

Eligible schools will receive grants, instructions to prepare points in two months | पात्र शाळांना मिळणार अनुदान, दोन महिन्यात बिंदुनामावली तयार कराण्यांचे निर्देश

पात्र शाळांना मिळणार अनुदान, दोन महिन्यात बिंदुनामावली तयार कराण्यांचे निर्देश

Next

पुणे : राज्यातील २० टक्के व ४० टक्के अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांनी तात्काळ बिंदुनामावली पूर्ण करून घ्यावी, असे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. संबंधित शाळांना अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्यामुळे धडक मोहीम कार्यक्रम राबवून बिंदुनामावली तयार करून शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून तपासून घ्यावी, असेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २० टक्के व ४० टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरित करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यात बिदुनामावली अध्यायात नसल्यामुळे अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्याचे वित्त विभागाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे राज्यातील अनुदानित अनुदानास पात्र घोषित व अनुदानास पात्र असणाºया शाळांची बिंदुनामावली तपासण्यासाठी धडक मोहीम कार्यक्रम राबविण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

अनुदानित पात्र असणाºया शाळांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये धडक मोहीम राबवून संबंधित शाळांची बिंदुनामावली तयार करावी, असे निर्देश राज्याच्या सर्व शिक्षण उपसंचालक व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य.

Web Title: Eligible schools will receive grants, instructions to prepare points in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.