प्रश्न पत्रिकेतील त्रुटी केल्या दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:01+5:302021-04-18T04:11:01+5:30
शुक्रवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी परीक्षा विभागाला भेट देऊन परीक्षेचा आढावा घेतला. शुक्रवारी घेण्यात ...
शुक्रवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी परीक्षा विभागाला भेट देऊन परीक्षेचा आढावा घेतला. शुक्रवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत अभियांत्रिकीच्या पेपरमध्ये आठ प्रश्नांमधील आकृत्या दिसत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवाना अडचणी आल्या. तब्बल २ हजार विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. त्यामुळे शनिवारी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी बैठक घेऊन यातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.
डॉ. चासकर म्हणाले, ‘‘विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या बहुतांश विषयांच्या परीक्षेत आकृत्यांवरील प्रश्न आहेत. यापुढील परीक्षात अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी सर्व तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ठरलेल्या वेळेत लॉगईन करावे, उशीर करू नये. परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लवकर लॉगईन करावे.