अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन बागळणे गरजेचं
By admin | Published: March 3, 2017 03:26 PM2017-03-03T15:26:38+5:302017-03-03T15:26:38+5:30
जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Next
ऑनलाइन लोकमत
जुन्नर, दि. 3 - अंधश्रद्धा व अनिष्ट चालीरितींच्या समूळ नायनाटासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाळगणे आजच्या काळाची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी एका कार्यक्रमात केले.
निवासी कन्या आश्रमशाळा सोमतवाडी येथील विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक लांडे, शाळेच्या मुख्याधीपिका सुनिता कांबळे, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे सचिव टी.आर. वामन, सदस्य दिलीप लोंढे, प्रवीण ताजने, व्यंकट मुंढे, ज्ञानेश्वर केंद्रे, कुस्तीगीर संघाचे संचालक सचिन मुंढे, पत्रकार विजय लोखंडे, शिक्षिका अनिता पवार आदी उपस्थित होते.
जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार विज्ञान दिनाचे औचित्य साधून आदिवासी भागातील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यान मालेचे आयोजन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने राष्टीय विज्ञान दिन साजरा केला असल्याचे रतिलाल बाबेल यांनी सांगितले.
व्याख्यानमालेची सुरुवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी रतिलाल बाबेल, टी.आर वामन, सचिन मुंढे, प्रवीण ताजने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आश्रम शाळेत पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आल्याने विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले होते.