चित्रपटाला शोभेल 'असा' थरार..! लष्कर आणि पोलिसांकडून लुल्लानगरमध्ये लपलेल्या 'दहशतवाद्यांचा खात्मा’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 02:35 PM2020-10-14T14:35:09+5:302020-10-14T14:39:29+5:30

एखाद्या चित्रपटातील शोभेल असा हा प्रसंग नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला.

'Elimination of terrorists' hidden in Lullanagar by army and police | चित्रपटाला शोभेल 'असा' थरार..! लष्कर आणि पोलिसांकडून लुल्लानगरमध्ये लपलेल्या 'दहशतवाद्यांचा खात्मा’

चित्रपटाला शोभेल 'असा' थरार..! लष्कर आणि पोलिसांकडून लुल्लानगरमध्ये लपलेल्या 'दहशतवाद्यांचा खात्मा’

Next
ठळक मुद्देलष्कर आणि पोलिसांचा संयुक्त सराव: भविष्यातील संकटांना संयुक्तपणे देणार तोंड या सरावात आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांचा केला वापर

पुणे : पुण्यातील लुल्लानगरमध्ये एका इमारतीत दहशतवादी लपल्याचा फोन पोलीसांना येतो. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराचे अग्नीबाज पथक आणि पोलिसांची  'क्विक अ‍ॅक्शन' पथक संयुक्त मोहिम हाती घेत 'कोव्हर्ट' आॅपरेशन सुरू  करतात. माहिती प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जवान इमारतीला वेढा घातलात. प्रचंड गोळीबार, बॉम्बवर्षावात इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांचा ठार करत अखेर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 

एखाद्या चित्रपटातील शोभेल असा हा प्रसंग नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला. लष्कराच्या दक्षिण विभागाचे अग्निबाज पथक आणि पुणेपोलिसांच्या' क्विक रिअ‍ॅक्शन' पथकाने दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ‘आॅपरेशन सुरक्षा कवच’ या संयुक्त सरावाचे आयोजन शुक्रवारी (दि ९) केले होते. 

पुण्यातील कोणत्याही दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी दहशतवादविरोधी क्विक रिएक्शन टीम (क्यूआरटी) सक्रिय करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांत सामंजस्य राखत संयुक्त कारवाईचा उद्देश या सरावाचा होता. या सरावात डॉग स्क्वॉड्स आणि  बॉम्ब डिस्पोजल पथक तसेच दहशतवादविरोधी पथक (एटीएस)व पोलिसही सहभागी झाले होते.  वाहतूक पोलीस आणि लष्कराच्या पोलीस दलाने कारवाई दरम्यान जवळपासच्या  वाहतूकीचे नियंत्रण केले. यानंतर  लष्कराच्या दहशतवाविरोधी टास्क फोर्सने (सीटीटीएफ) आणि  पोलिसांच्या क्विक रिएक्शन पथकाने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी संयुक्त कारवाई केली. 


 ....
आधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापर

या दहशतवाद विरोधी सरावात लष्कर आणि पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांचा वापर केला. डॉग स्कॉडद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. यानंतर बाँम्ब शोधक पथकाने दहशतवाद्यांनी लपवलेली स्फोटके निकामी केली. सरावानंतर स्थानिकांसाठी  लष्कर आणि पोलीसांच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. 
......

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता...

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या सरावात मोजक्याच जवान आणि पोलिसांनी सहभाग घेतला. दरम्यान सर्व काळजी घेण्यात आली. या सरावामुळे सैन्य आणि पोलिसदलात परस्पर सहकार्य, संयुक्त कवायती, कार्यपद्धतीचे सहकार्य, समन्वय साधणे, एकत्रित अनुभवांचे सादरिकरण करण्यात आले.

Web Title: 'Elimination of terrorists' hidden in Lullanagar by army and police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.