अधिकाराचा गैरवापर करून ३ कोटी ६८ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:42+5:302021-06-28T04:09:42+5:30

पुणे : कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून कंपनीचे ३ कोटी ६८ लाख रुपये परदेशातील बँक खात्यात वळवले. कंपनीच्या विमा ...

Embezzlement of Rs. 3 crore 68 lakhs by abusing power | अधिकाराचा गैरवापर करून ३ कोटी ६८ लाखांचा अपहार

अधिकाराचा गैरवापर करून ३ कोटी ६८ लाखांचा अपहार

Next

पुणे : कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून कंपनीचे ३ कोटी ६८ लाख रुपये परदेशातील बँक खात्यात वळवले. कंपनीच्या विमा क्लेम रकमेच्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी राहुल रतनलाल कौल (रा. पिंपळे सौदागर, रहाटणी) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदित्य लोंढे व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य लोंढे व इतरांना फिर्यादीच्या कंपनीमधील त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या सहकारी यांनी विश्वासाने दिलेल्या लॉगिनचा गैरवापर केला. सहकारी कर्मचाऱ्र्यांचा विश्वासघात करून स्वत:चा युजर आयडी वापरून कंपनीचे ३ कोटी ६८ लाख रुपये अनाधिकाराने इतर बँक खात्यामध्ये तसेच परदेशातील बँक खात्यात वळते केले. फिर्याीदीच्या कंपनीच्या विमा क्लेम रकमेच्या नुकसानीस कारणीभूत होऊन फसवणूक करुन अपहार केला. पोलीस निरीक्षक चिंतामणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Embezzlement of Rs. 3 crore 68 lakhs by abusing power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.