बारामतीत आपत्कालीन लोडशेडिंगचा ग्राहकांना शॉक; अनेक गावे काल रात्रीपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:58 PM2022-04-08T13:58:53+5:302022-04-08T13:59:05+5:30

महाराष्ट्रात कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे विज उत्पादन संकटात

Emergency load shedding shocks customers in Baramati Many villages have been in darkness since last night | बारामतीत आपत्कालीन लोडशेडिंगचा ग्राहकांना शॉक; अनेक गावे काल रात्रीपासून अंधारात

बारामतीत आपत्कालीन लोडशेडिंगचा ग्राहकांना शॉक; अनेक गावे काल रात्रीपासून अंधारात

googlenewsNext

बारामती : महावितरणने आता मागणीप्रमाणे विजेचे उत्पादन होत नसल्याने आपत्कालीन लोडशेडिंगचा ग्राहकांना शॉक दिला आहे. या आपत्कालीन लोडशेडिंग मध्ये वेळेचे नियोजन नसल्याने केव्हाही वीज जाते. परिणामी बारामती परिमंडळातील अनेक गावे काल रात्रीपासून अंधारात आहेत.

कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रातील विज उत्पादन संकटात आले आहे. परिणामी विजेच्या मागणीप्रमाणे विजेचे उत्पादन होत नाही. त्यामुळे केंव्हाही आपत्कालीन लोड शेडिंग करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयातून येत आहेत. सध्या बारामती परिमंडळातील सर्व उपकेंद्रामध्ये लोडशेडिंग सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कोणत्याही क्षणी, कोणत्याही फिडरवर लोडशेडिंगचा एस एम एस उपकेंद्राला दिला जात आहे. त्यानंतर वीज गेल्यावर किती वेळात येईल याची देखील माहिती उपकेंद्र देखील देऊ शकत नाही. ऐन उन्हाळ्यात आपत्कालीन लोडशेडिंग मुळे आता ग्राहकांची चांगलेच हाल होणार आहेत. याबाबत बारामती परिमंडळ आणि अधिकृत सूचना जारी केली नसली तरी महावितरणच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मोबाईल व्हाट्सअप द्वारे आपापल्या परिसरातील वीज ग्राहकांना या आपत्कालीन लोडशेडिंग बाबत सतर्क केले आहे. 

Web Title: Emergency load shedding shocks customers in Baramati Many villages have been in darkness since last night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.