उद्योगनगरीत रमजान ईद उत्साहात

By admin | Published: June 27, 2017 07:17 AM2017-06-27T07:17:33+5:302017-06-27T07:17:33+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी असलेल्या मस्जिद ईदगाह मैदान वर रमजान

Emergency Ramadan Id | उद्योगनगरीत रमजान ईद उत्साहात

उद्योगनगरीत रमजान ईद उत्साहात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नेहरूनगर : पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी असलेल्या मस्जिद ईदगाह मैदान वर रमजान ईद ची ईदुल फित्र ची नमाज अदा करून मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, कुदळवाडी, काळेवाडी, नेहरूनगर, मोरवाडी, खराळवाडी, मासुळकर कॉलनी आदी परिसरातील मस्जिद ईदगाह मैदान वरती सकाळी ९ च्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची ईद-उल-फित्र ची नमाज अदा केली. नमाज पठाणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर अनेक मुस्लीम बांधवांनी रमजान ईद निमित्त शिरखुर्मा हा सुक्या मेव्यापासून तयार केलेल्या गोड पदार्थाची मेजवानी देऊन मोठ्या उत्साहात ईद साजरी केली. ईदनिमित अनेक मुस्लिम बांधवांनी गोर गरीब नागरिकांना जकात फित्रा चे वाटप केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या नेहरूनगर येथील ईदगाह मैदानावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता मौलाना आझाद व मौलाना हाफिज यांनी रमजान ईदनिमित्त ईदुल फित्र ची २ रखात नमजाचे पठण करून मुस्लिम बांधवांना रमजान ईद चे महत्त्व सांगितले. या वेळी नेहरूनगर, संततुकारामनगर, वल्लभनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, बालाजीनगर, यशवंतनगर, फुलेनगर, गवळीमाथा आदी परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे रमजान ईद ची ईद-उल-फित्र ही नमाज अदा केली. अल्लाजवळ सर्व नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना (दुवा) केली. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड मुस्लिम वेलफेयर अँड कब्रस्थान ईदगाह कमिटी चे अध्यक्ष ए़ बी़ शेख, फारूक इनामदार, जिलानी मुलानी, नादिर शेख, कादर शेख, जिलाणी शेख, मीरा तराजगार, जाकीर शेख आदींनी केले होते.
या वेळी माजी महापौर हनुमंतराव भोसले, नगरसेवक राहुल भोसले, माजी महापौर वैशाली घोडेकर, लोंढे आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र विभांडिक, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, यांच्या सह ३० पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सांगवीमध्ये कार्यक्रम-
सांगवी : परिसरातील श्रुष्टी चौक, दापोडी रोडवरील आणि जुनी संगवीतील ईदगाह स्थानी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Emergency Ramadan Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.