वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवाच सुरू, अन्य दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:57+5:302021-06-19T04:08:57+5:30

मागील आठवड्यात पालिकेने आदेश काढत दुकानांच्या वेळा संध्याकाळी सातपर्यंत वाढविण्यात आली होती. तर, हॉटेल, रेस्टोरंट, बारची वेळ रात्री दहा ...

Emergency services resume in weekend lockdown, other shops closed | वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवाच सुरू, अन्य दुकाने बंद

वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवाच सुरू, अन्य दुकाने बंद

Next

मागील आठवड्यात पालिकेने आदेश काढत दुकानांच्या वेळा संध्याकाळी सातपर्यंत वाढविण्यात आली होती. तर, हॉटेल, रेस्टोरंट, बारची वेळ रात्री दहा वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील आठवड्यात ''वीकेंड लॉकडाऊन'' उठविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, पालिकेने शुक्रवारी आदेश काढत वीकेंड लॉकडाऊन कायम असल्याचे स्पष्ट केले.

पालिकेच्या हद्दीतील अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर शनिवार व रविवारी बंद राहणार आहेत. रेस्टोरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा देऊ शकणार आहेत. घरपोच सेवा देण्याकरिता रात्री ११ पर्यंत मुभा देण्यात आली आहे.

शेती संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे सुरु राहतील.

Web Title: Emergency services resume in weekend lockdown, other shops closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.