Video: पुण्यात मध्यरात्री थरार! जोशी पुलाजवळ ५ प्रवाशांची कार वाहून गेली; बहीण भावाला बिलगली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 08:11 AM2022-08-12T08:11:19+5:302022-08-12T08:12:02+5:30

Pune Car Drowned Video: पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी हा प्रकार घडला आहे.

Emotional Video: Palghar lalwani Family Car Drowned in Pune SM Joshi bridge river flood, all 5 people rescued | Video: पुण्यात मध्यरात्री थरार! जोशी पुलाजवळ ५ प्रवाशांची कार वाहून गेली; बहीण भावाला बिलगली...

Video: पुण्यात मध्यरात्री थरार! जोशी पुलाजवळ ५ प्रवाशांची कार वाहून गेली; बहीण भावाला बिलगली...

googlenewsNext

पुण्यात नदीपात्रात लावलेल्या कार पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाली की नेहमी पाण्यात वाहून जातात. हा भिडे पुलाकडील प्रकार असतो. परंतू, मध्यरात्री पुण्यातील एस एम जोशी पुलाजवळ थरारक घटना घडली. पालघरहून पुण्यात आलेले कुटुंबीय मध्यरात्रीनंतर या भागातून जात असताना त्यांची कार पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागली. या कारमध्ये लहान मुलासह पाच जण होते. या सर्वांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतू, भावा आणि बहीणीने एकमेकांसाठी दिलेली हाक अनेकांचे काळीज चिरणारी आहे. 

पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी हा प्रकार घडला आहे. पोलिसांचा फोन खणाणला. एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती मिळाली. लागलीच एरऺडवणा पोलीस आणि आग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. 

रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून या जवानांनी कारमधील पाचही जणांना वाचविले. दिलासा देणारी बाब म्हणजे ही कार पाणी कमी असल्याने काही अंतरावर जाऊन थांबली होती. अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही कार पालघरची होती, ते रक्षाबंधन असल्याने पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. रजपूत विटभट्टी कडून ते पात्रातील रस्त्याने जात होत. त्यांची कार गरवारे पुलाखाली अडकली होती. एरऺडवणा, जनता वसाहत सेंट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि या मोठी दुर्घटना टळली. ड्रायव्हर ज्ञानेश्वर खेडेकर, फायरमन किशोर बने, दिलीप घडशी, मदतनीस सऺदीप कार्ले यांनी मदत केली. 


मेरा भाई किधर है, उसके पास जाना है.... दीदी.... दोघेही बिलगले....
पालघरमधील हे लालवाणी कुटुंबीय होते. आठ वर्षांचा मुलगा कृष्णा आणि त्याची मोठी बहीण वंचिका दोघेही एकमेकांना बिलगले. कृष्णाला जवानांनी आधीच पाण्याबाहेर आणले होते. तर वंचिका पाण्यातून बिथरलेली बाहेर आली आणि ती भावाला शोधू लागली. मेरा भाई किधर है, उसके पास जाना है म्हणत असताना तिला जवानांनी पोलिसांच्या खांद्यावर असलेल्या तिच्या भावाकडे नेऊन सोडले.... कृष्णादेखील दीदी दीदी करत तिला बिलगला. 
२.प्रिया लाल वाणी वय २२,
३. कुणाल लाल वाणी वय २८
४.कपिल लाल वाणी वय २१

Web Title: Emotional Video: Palghar lalwani Family Car Drowned in Pune SM Joshi bridge river flood, all 5 people rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.