अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यावर जोर
By admin | Published: December 2, 2014 06:03 AM2014-12-02T06:03:40+5:302014-12-02T06:03:40+5:30
तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नियंत्रण आणलेली अनधिकृत बांधकामे विद्यमान आयुक्त राजीव जाधव यांच्या काळात जोमात सुरू आहेत.
पिंपरी : तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नियंत्रण आणलेली अनधिकृत बांधकामे विद्यमान आयुक्त राजीव जाधव यांच्या काळात जोमात सुरू आहेत. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि बीट निरीक्षकांवर यांच्यावर जबाबदारी निश्चित केली असताना, राजरोसपणे अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
दूर अंतरावर कोठे कोपऱ्यात अनधिकृत बांधकामे सुरू असतील, छुप्या पद्धतीने ती पूर्ण करण्याचे प्रयत्न होत असतील, तर बीट निरीक्षकांचे अशा बांधकामांकडे लक्ष जाणार नाही, परंतु महापालिकेच्या प्रशासकीय इमतारतीच्या जवळ होकच्या अंतरावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबतही अधिकारी, कर्मचारी डोळेझाक करू लागले आहेत.
महापालिकेने दोन वर्षांच्या कालावधीत १५ लाख ४४ हजार ६९७ चौरस फुटांची ६८४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. ३१ मार्च २०१२ नंतर अनधिकृत बांधकामे होता कामा नयेत, असे धोरण अवंलंबले असताना, बांधकामे सुरूच राहिली. २००७ बांधकामधारकांवर गुन्हे दाखल झाले. नोटीस दिलेल्यांमध्ये मिळकतींमध्ये ५९ लाख १४ हजार ३१६ चौरस फुटांची बांधकामे आहेत.