कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर द्या: केंद्रीय पथकाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:22 PM2020-05-08T16:22:52+5:302020-05-08T16:23:18+5:30

कोविड 19 ची वाढती रुग्णसंख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक

Emphasis on 'contact tracing' of corona positive patients: Central team instructions | कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर द्या: केंद्रीय पथकाच्या सूचना

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर द्या: केंद्रीय पथकाच्या सूचना

Next
ठळक मुद्देकेंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक शुक्रवारी (दि.8) रोजी पुण्यात दाखल झाले. या पथकाने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत जिल्ह्यातील कोरोना विषय सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. यामध्ये त्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे तसेच आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना क्रेंदीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक डॉ. सुधीर गुप्ता यांनी केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती रुग्ण संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक उप महासंचालक डॉ. मानस रॉय, वरिष्ठ क्षेत्रीय संचालक डॉ. अरविंद अलोणे उपस्थित होते. डॉ. गुप्ता म्हणाले, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पुणे जिल्हयाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा व माहिती घेणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची रुग्णालये तसेच ससून, भारती हॉस्पिटल आदी कोरोनावर उपचार करणा?्या रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करणार आहोत. 
यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हयात वाढत असणा?्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आर.एस. आडकेकर उपस्थित होते.

Web Title: Emphasis on 'contact tracing' of corona positive patients: Central team instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.