आरोग्य केंद्रांना लागलीच मनुष्यबळ देण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:39+5:302020-12-26T04:10:39+5:30
पुणे : * आरोग्य विभाग पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधील कार्यरत असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे महापालिकेच्या ताब्यात ...
पुणे :
* आरोग्य विभाग
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधील कार्यरत असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे महापालिकेच्या ताब्यात आल्यावर, याठिकाणी लागलीच महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतचे आरोग्य विभागाचे नियोजन राहिल़, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी दिली़
शहरी भागात ३० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असे राज्य शासनाचे निकष आहेत़ त्यानुसार नियोजन केले जात असते़ नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य कोठ्या आदींचे हस्तांतरण झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल़ तसेच या गावांमध्ये वेळेवर औषध फवारणी करणे, भटकी कुत्री बंदोबस्त करणे, जन्म-मृत्यू केंद्राची उभारणी करणे ही कामे अंतिम आदेश आल्यावर प्रारंभ होतील असेही डॉ़ भारती यांनी सांगितले़
------------------