रमजानचा महिना साधेपणाने साजरा करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:04+5:302021-05-01T04:09:04+5:30

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव नियमित नमाजपठण आणि इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता ...

Emphasis on simply celebrating the month of Ramadan | रमजानचा महिना साधेपणाने साजरा करण्यावर भर

रमजानचा महिना साधेपणाने साजरा करण्यावर भर

Next

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव नियमित नमाजपठण आणि इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात साजरे करत असल्याचे चित्र नीरासह पुरंदर तालुक्यात दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सामाजिक अंतर व स्वच्छतेच्या नियमांचे (मास्क व सॅनिटायझर) पालन करून पवित्र रमजान महिना घरीच साजरा करण्यावर मुस्लिम बांधवांनी नीरेमध्ये भर दिला आहे.

या महिन्यात मुस्लिम बांधव तीस दिवस दररोज पहाटेपासूनच उपवास ठेवतात आणि संध्याकाळी मगरीबच्या नमाजपूर्वी उपवास सोडतात. त्यानंतर इशा नमाज व तराबीची नमाजमध्ये कुराणपठण केले जाते. रमजान महिन्यात २७ शब (मोठी रात्र व कुराण समाप्ती) या दिवशी सामूहिक दुवापठण करण्याची प्रथा आहे. परंतु या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये न जाता नमाज व दुवापठण आपल्या घरातूनच करावे, असे समाजबांधवातर्फे आवाहन करण्यात आले असून, समाजबांधव यांचे काटेकोर पालन करत आहेत. पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईदची नमाज व ईद साजरी करण्याची प्रथा आहे. यानिमित्त मुस्लिम बांधव तरावीहची नमाज संपण्यापूर्वी आपापल्या विभागातील मशिदीमध्ये पवित्र कुराणपठण आणि नमाज अदा करतात. परंतु कोरोनाचे पार्श्वभूमीवर या वर्षी मुस्लिम बांधवांनी सर्व धार्मिक कार्यक्रम व रमजान ईद घरात राहूनच साजरे करावेत, असे आवाहन पुरंदर तालुका व पोलीस प्रशासनाने केले आहे.

रमजान महिन्यात शुक्रवार (जुम्मा) जोहरची नमाज ही दुपारी मस्जिदमध्ये केली जात, पण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरातच नमाजपठण करताना युवक.

Web Title: Emphasis on simply celebrating the month of Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.